मुदत संपूनही ४० हजार जणांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:29+5:302021-09-02T04:55:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी व बचावासाठी सध्याचे सर्वाधिक प्रभावी साधन असलेल्या लसीकरणाचा वेग वाढतो आहे. मात्र, ...

मुदत संपूनही ४० हजार जणांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस!
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी व बचावासाठी सध्याचे सर्वाधिक प्रभावी साधन असलेल्या लसीकरणाचा वेग वाढतो आहे. मात्र, पहिली लस घेऊन त्याची मुदत संपली असतानाही दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांकडून टाळाटाळच अधिक होत आहे. निर्बंध शिथील केल्याने कामात गुंतलेले लोक आणि सणासुदीच्या लगबगीमुळेही लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण झाल्यानंतर खऱ्याअर्थाने संपूर्ण संरक्षणाची शक्यता असते. किमान कोरोना संसर्ग झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या गुंतागुंत व त्याचे स्वरुप गंभीर होण्यासही अटकाव घालण्यासाठी डोस महत्वाचे आहेत. पहिला डोस घेताना दाखवलेली तत्परता दुसरा डोस घेताना दिसून येत नाही. त्यामुळे सरासरी ४० हजारहून अधिक जणांनी दुसरा डोस अद्यापही घेतला नाही.
चौकट
दुसरा डोस घेणेही तितकेच आवश्यक
* कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण महत्वाचे असलेतरी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे खूपच महत्वाचे आहे.
* लसीकरणानंतर तयार होणाऱ्या ॲन्टीबॉडीजमुळे कोरोनाचे गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. त्यामुळे पहिला आणि दुसराही डोस घेणे तितकेच महत्वाचे आहे.
चौकट
व्यवहार झाले सुरु, लसीकरणाकडे होतेय दुर्लक्ष
कोरोना संसर्ग टाळण्यासाठक्ष प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे बहुतांश व्यवहार बंद असल्याने नागरिकांना लसीसाठी वेळ होता. आता सर्व व्यवहार खुले झाल्याने अनेकजण आपल्या कामात गुंतला आहे. शिवाय आता सणासुदीचे दिवस सुरु होणार असल्यानेही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
कोट
सध्या लसींची उपलब्धता वाढत आहे. शिवाय केंद्रावरील गर्दीही कमी असल्याने दुसरा डोस असलेल्या नागरिकांनी लस घ्यावी. कोरोनामुळे होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे.
डॉ. विवेक पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी.
चौकट
जिल्ह्यात झालेले लसीकरण
पहिला डोस १२०९४३२
दुसरा डोस ४९२११६