मिरजेत ४० हजारांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:32 IST2021-09-08T04:32:52+5:302021-09-08T04:32:52+5:30

तबरेज शेख हा तरुण स्टेशन रोडवरील आकाश फॅशन स्टुडिओ व शान सायकल सर्व्हिस या दुकानाच्या पाठीमागे थांबून गांजाची विक्री ...

40,000 cannabis seized in Miraj | मिरजेत ४० हजारांचा गांजा जप्त

मिरजेत ४० हजारांचा गांजा जप्त

तबरेज शेख हा तरुण स्टेशन रोडवरील आकाश फॅशन स्टुडिओ व शान सायकल सर्व्हिस या दुकानाच्या पाठीमागे थांबून गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी शहर पोलिसांनी तेथे छापा टाकल्यानंतर तबरेज हा गांजाची विक्री करीत असताना मिळून आला. पोलिसांनी त्याला पकडून तपासणी केली असता, त्याच्याजवळ सुमारे दोन किलो ५६० ग्रॅम वजनाचा ओला गांजा मिळून आला. या गांजाची किंमत सुमारे ४० हजार रुपये आहे. पोलिसांनी गांजासाठा जप्त करून तबरेज शेख याला अटक केली. शहरात दर्गा रोड ते स्टेशन रोड परिसरात गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याचे शेख याच्या चाैकशीत निष्पन्न झाले. नशेबाज तरुणांच्या टोळ्या याच भागात सक्रिय असून गांजाची नशा करून प्रवाशांना व नागरिकांना लुटण्याचा उद्योग सुरू आहे.

Web Title: 40,000 cannabis seized in Miraj