शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

डीजेच्या दणदणाटाने सांगली जिल्ह्यात तिसरा बळी, मिरजेतील मिरवणुकीत घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 12:12 IST

कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने ७० ते ८० डेसिबलची मर्यादाही ओलांडली

सांगली : सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने दुधारी (ता. वाळवा) व कवठेएकंद (ता. तासगाव) येथील दोन तरुणांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी मिरजेतील सार्वजनिक मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादाकायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. राज्य शासनाच्या तोंडी आदेशामुळे निर्बंधमुक्त सार्वजनिक मंडळाचा गणेश उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी ध्वनीक्षेपकाच्या भिंती उभारण्यास व आवाजवर निर्बंध असतात. यावर्षी सर्व मिरवणुका निर्बंधमुक्त झाल्याने सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यांसह शहर व मिरजेतील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला. गणेशभक्त व मिरवणुका पाहण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने ७० ते ८० डेसिबलची मर्यादाही ओलांडली.मिरज शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर गुरुवारी रात्री डाॅल्बीचा दणदणाट होता. या मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यूची घटना शुक्रवारी उघडकीस आली. सुमारे ५० वर्षे वयाच्या या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्याचा डीजेच्या दणदणाटामुळे हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

मृत्यूचे कारण अस्पष्ट ?मिरजेतील गुरुवार पेठेत डॉल्बीच्या दणदणाटामध्येच मिरवणुका सुरू झाल्या. याठिकाणी अज्ञात व्यक्ती रस्त्याच्या बाजूला पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचा जागीच मृत्यू झालेला होता. याबाबत पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी संबंधित व्यक्तीचा मृत्यू डाॅल्बीमुळे झाला की अन्य कारणांमुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीGanesh Mahotsavगणेशोत्सवDeathमृत्यू