शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत विटा नगरपालिकेचा पुणे विभागात तिसरा क्रमांक; एक कोटीचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 18:16 IST

विटा : स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात देशपातळीवर यश संपादन केल्यानंतर आता राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे आयोजित मुख्यमंत्री सक्षम शहर ...

विटा : स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात देशपातळीवर यश संपादन केल्यानंतर आता राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे आयोजित मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत विटा नगरपरिषदेने पुणे विभागात तिसरा क्रमांक पटकाविला. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विटा शहराची पहाणी केल्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर केला. विटा नगरपालिकेने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावून एक कोटी रूपयांचे बक्षीस जिंकले.राज्य शासनाने ‘ड’ वर्ग महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी दि. १५ सप्टेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३ चे आयोजन केले होते. पहिल्यांदा विभागीय स्तरावर वर्गनिहाय सर्वाधिक गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या तीन शहरांची निवड करण्यात आली.

या स्पर्धेसाठी २५ निकष ठेवण्यात आले होते. घरोघरी जाऊन १०० टक्के विलगीकरण कचरा संकलित करणे, शहरात प्लास्टिक बंदी अंमलबजावणी, प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण कार्यवाही, मालमत्ता कर संकलन, स्थावर, जंगम मालमत्तेच्या विनियोगाचे व्यवस्थापन, आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ, शहराने राबविलेली नावीन्यपूर्ण योजना, फेरीवाला विरहित क्षेत्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा व जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असणे यासह विविध निकषांचा या स्पर्धेत समावेश होता.या स्पर्धेसाठी गेल्या दीड महिन्यापूर्वी विभागीय निवड समितीने पाहणी केली. त्यानंतर विविध निकषाप्रमाणे गुण देण्यात आले. या स्पर्धेत विटा नगरपालिकेने ‘अ’ व ‘ब’ वर्गामध्ये पुणे विभागात तिसरा क्रमांक पटकाविला. मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत विटा नगरपरिषदेने विभागात तिसरा क्रमांक पटकाविल्याचे वृत्त समजताच शहरात जल्लोष करण्यात आला. स्पर्धेत तिसरा क्रमांक संपादन करून विटा नगरपरिषदेने एक कोटी रूपयांचे पारितोषिक पटकाविले.

मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेसाठी विटा शहराची विभागीय स्तरावर पाहणी करण्यात आली. त्यावेळी दिलेल्या निकषाप्रमाणे गुण मिळाल्याने विटा नगरपरिषदेने या स्पर्धेत पुणे विभागात तिसरा क्रमांक पटकाविला असून एक कोटी रूपयांचे बक्षीस मिळविले आहे. विभागीय स्तरासाठी तीनच क्रमांक काढण्यात आले होते. त्या पहिल्या तीन क्रमांकात येण्याचा बहुमान विटा नगरपालिकेला मिळाला आहे. - विक्रमसिंह पाटील, मुख्याधिकारी विटा नगरपरिषद, विटा.

टॅग्स :Sangliसांगली