जिल्ह्यात कोरोनाचे नवे ३९७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:36+5:302021-09-02T04:56:36+5:30

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवे ३९७ रुग्ण आढळून आले, तर ५५२ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील अकरा जणांचा ...

397 new corona patients in the district | जिल्ह्यात कोरोनाचे नवे ३९७ रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे नवे ३९७ रुग्ण

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवे ३९७ रुग्ण आढळून आले, तर ५५२ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील अकरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

मंगळवारी महापालिका क्षेत्रात ५५ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीत ४७, मिरजेत ८ रुग्णांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यात ३३, जत २२, कडेगाव २२, कवठेमहांकाळ १५, खानापूर ५४, मिरज ५१, पलूस १६, शिराळा ५, तासगाव ८०, वाळवा ४४; तर जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.

दिवसभरात जिल्ह्यातील ११ जणांचा मृत्यू झाला. त्यात जत, कडेगाव तालुक्यातील प्रत्येकी १, खानापूर व पलूस प्रत्येकी दोन, कवठेमहांकाळ तालुक्यात ३, तर महापालिका क्षेत्रातील दोन रुग्णांचा समावेश आहे. सध्या ६७६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आरटीपीसीआरच्या ५३६० चाचण्यांत २१५ पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ५८८३ चाचण्यांत १८४ रुग्ण सापडले.

चौकट

आतापर्यंतचे बाधित : १,९२,३६३

कोरोनामुक्त झालेले : १,८३,८९५

आतापर्यंतचे मृत्यू : ५०५४

उपचाराखालील रुग्ण : ३४१४

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

सांगली : ४७

मिरज : ८

आटपाडी : ३३

जत : २२

कडेगाव : २२

कवठेमहांकाळ : १५

खानापूर : ५४

मिरज : ५१

पलूस : १६

शिराळा : ०५

तासगाव : ८०

वाळवा : ४४

Web Title: 397 new corona patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.