जिल्ह्यात ३९५ जण पॉझिटिव्ह; सात जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:31 IST2021-08-28T04:31:01+5:302021-08-28T04:31:01+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी घट झाली. ३९५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मृत्यूसंख्याही घटत परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील सहा, ...

395 positive in the district; Seven people died | जिल्ह्यात ३९५ जण पॉझिटिव्ह; सात जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ३९५ जण पॉझिटिव्ह; सात जणांचा मृत्यू

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी घट झाली. ३९५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मृत्यूसंख्याही घटत परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील सहा, अशा सात जणांचा मृत्यू झाला. बाधितांपेक्षा जास्त ५१७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सरासरी पाचशेवर असणारी रुग्णसंख्या शुक्रवारी चारशेच्या आत आली. जिल्ह्यातील ६ जणांचा मृत्यू झाला. त्यात कडेगाव तालुक्यातील ३, खानापूर तालुक्यातील दोन, तर तासगाव तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत ४५१९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात २१७ जण पॉझिटिव्ह आले, तर रॅपिड अँटिजनच्या ६३५२ जणांच्या नमुने तपासणीतून १८४ जण बाधित आढळले.

उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येतही घट होत असून, ३ हजार ९७८ जण उपचार घेत आहेत. त्यापैकी ६६६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५७६ जण ऑक्सिजनवर, तर ९० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू, तर नवीन ६ जण उपचारार्थ दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १९०८९३

उपचार घेत असलेले ३९७८

कोरोनामुक्त झालेले १८१८९७

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५०१८

शुक्रवारी दिवसभरात

सांगली ४१

मिरज ८

आटपाडी २२

कडेगाव ४४

खानापूर ३०

पलूस ८

तासगाव ९२

जत ३७

कवठेमहांकाळ १९

मिरज तालुका ५४

शिराळा १६

वाळवा २४

Web Title: 395 positive in the district; Seven people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.