खानापूर तालुक्यात कोरोनाचे नवे ३९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:45+5:302021-03-30T04:17:45+5:30
विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात दोन दिवसांत कोरोनाचे नवे ३९ रुग्ण आढळून आले. तालुक्यात सध्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने ...

खानापूर तालुक्यात कोरोनाचे नवे ३९ रुग्ण
विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात दोन दिवसांत कोरोनाचे नवे ३९ रुग्ण आढळून आले. तालुक्यात सध्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
रविवारी विटा शहरासह तालुक्यात नवे २६ तर सोमवारी नवीन १३ कोरोना रुग्ण आढळून आले. रविवार व सोमवार या दोन दिवसांत विटा शहरात नवे १८, नागेवाडी, खानापूर प्रत्येकी ३, घोटी बुद्रूक, लेंगरे, माधळमुठी प्रत्येकी २ तर कुर्ली, कार्वे, पारे, बलवडी (खा.), ऐनवाडी, मोही, ढवळेश्वर, माहुली व घानवड येथे प्रत्येकी १ असे नवीन ३९ कोरोना रुग्ण आढळून आले.
पोलीस प्रशासनाच्या वतीने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात असून, नागरिकांनी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार हृषीकेश शेळके यांनी केले आहे.