शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातून विधानसभेच्या मतदार यादीवर ३८१४५ हरकती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 18:01 IST

३० ऑगस्टला अंतिम होणार मतदार यादी

सांगली : जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, विधानसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम केली जात आहे. सध्या प्रारूप यादीवर जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून ३८ हजार १४५ हरकती मिळाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक हरकती यादीत नावे समाविष्ट करण्याच्या आहेत. दि. ३० ऑगस्ट रोजी ही मतदार यादी अंतिम होणार आहे.लोकसभा निवडणुकीवेळी अनेकांकडे मतदान ओळखपत्र होते. तरी देखील त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मतदारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे विधानसभेच्या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या २४ हजार ६५८ मतदारांनी हरकती घेत नाव समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. त्या सर्व हरकतींचा निपटारा करण्याची कार्यवाही सुरू आहे.दुसरीकडे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्याच ईव्हीएम वापरल्या जाणार असून, त्याची दुरुस्ती व तपासणी देखील सुरू आहे. दि. ३१ ऑगस्टनंतर त्या ईव्हीएम सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पोहोच केल्या जाणार आहेत. दरम्यान, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली तरी देखील नवमतदारांना पुन्हा पुरवणी यादीच्या माध्यमातून नावे समाविष्ट करण्याची संधी असणार आहे.

मतदार यादीवरील हरकती

  • नावे समाविष्ट : २४,६५८
  • नावे डिलीट करणे : ६,१४५
  • नावात दुरुस्ती : ७,३४२
  • एकूण हरकती : ३८,१४५

विधानसभेला ४० लाखांची खर्च मर्यादालोकसभा निवडणुकीला प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा ९५ लाख रुपये करण्यात आली होती. तर आता विधानसभेला उभारणाऱ्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा २८ लाख रुपयांवरून ४० लाख रुपये करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकीत तेवढाच खर्च करावा लागणार आहे.

उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादानिवडणूकपूर्वी आतालोकसभा ७० लाख ९५ लाखविधानसभा २८ लाख ४० लाख

जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादी अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. दि. ३० ऑगस्ट रोजी यादी अंतिम होणार असून, त्यानंतर नव्याने समाविष्ट होणाऱ्या मतदारांची पुरवणी यादी तयार होईल. - नीता शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सांगली.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभा