जिल्ह्यात कोरोनाचे ३६० नवे रुग्ण, चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:27 IST2021-04-07T04:27:17+5:302021-04-07T04:27:17+5:30
कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंता वाढविणारी असतानाच सोमवारी ३६० जणांना कोरोना झाला आहे. महापालिका क्षेत्रात ७० नवे रुग्ण आढळले असून, ...

जिल्ह्यात कोरोनाचे ३६० नवे रुग्ण, चौघांचा मृत्यू
कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंता वाढविणारी असतानाच सोमवारी ३६० जणांना कोरोना झाला आहे. महापालिका क्षेत्रात ७० नवे रुग्ण आढळले असून, वाळवा तालुका पुन्हा एकदा हॉटस्पॉट ठरत आहे. साेमवारी ६१ रुग्ण वाळवा तालुक्यात आढळले आहेत.
आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर अंतर्गत १३०८ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यात २०३ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे तर रॅपिड ॲन्टिजनच्या १०४० चाचण्यांमधून १६३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जिल्ह्यात २६९७ जण रुग्णालयात उपचार घेत असून, त्यातील २६६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २३८ जण ऑक्सिजनवर तर २८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सातारा, ३, कोल्हापूर २ तर पुणे जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ५३१४०
उपचार घेत असलेले २६९७
कोरोनामुक्त झालेले ४८६२६
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८१७
सोमवारी दिवसभरात
सांगली ५०
मिरज २०
वाळवा ६१
खानापूर ४४
मिरज तालुका ४०
तासगाव २९
आटपाडी २७
कडेगाव २४
शिराळा १९
पलूस १७
कवठेमहांकाळ १५
जत १४