शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

वारणा धरणात 34.28 टी.एम.सी. पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 18:10 IST

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

ठळक मुद्देवारणा धरणात 34.28 टी.एम.सी. पाणीसाठाआटपाडी तालुक्यात 94.7 मि. मी. पावसाची नोंद

सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 104.72 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 13.23 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कण्हेर धरणात 9.94 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 9.88 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 25.39 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.25 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणाची साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असून हे धरण 100 टक्के भरले आहे. तसेच तारळी धरणाची साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. असून हे धरणही 100 टक्के भरले असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. धोम 130, कण्हेर 374, वारणा 582, दुधगंगा 600, राधानगरी 250, तुळशी 128, कासारी 250, पाटगाव 328 व अलमट्टी धरणातून 37000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 5.7 (45), आयर्विन पूल सांगली 9.3 (40) व अंकली पूल हरिपूर 10.2 (45.11).आटपाडी तालुक्यात 94.7 मि. मी. पावसाची नोंदसांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.44 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 94.7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.

मिरज 14.7 (521.4), तासगाव 0.3 (435.8), कवठेमहांकाळ 0.4 (496.5), वाळवा-इस्लामपूर 0.0 (603.8), शिराळा 0.0 (1288.5), कडेगाव 0.5 (532.2), पलूस 0.7 (439.2), खानापूर-विटा 15 (675.2), आटपाडी 94.7 (648.7), जत 11.9 (331.5). 

टॅग्स :DamधरणSangliसांगली