शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
3
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
4
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
5
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
7
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
8
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
9
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
10
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
11
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
12
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
13
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
14
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
15
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
16
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
17
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
18
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
19
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
20
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?

कर्नाटकमध्ये जाणाऱ्या ३३० एसटी फेऱ्या बंद

By admin | Updated: July 26, 2016 23:41 IST

महाराष्ट्रातील बसेस थांबून : मिरज आगाराला सर्वाधिक फटका; तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

मिरज : कर्नाटकात एसटी बंद आंदोलनामुळे व दगडफेकीच्या भीतीमुळे मिरज डेपोसह जिल्ह्यातील अन्य आगारांतून कर्नाटकात एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मिरज आगारातून दररोज ८० फेऱ्या व अन्य २५० एसटी फेऱ्या बंद झाल्याने एसटीला फटका बसला आहे. कर्नाटक एसटी बंद असल्याने मोठ्या प्रमाणात आंतरराज्य वाहतूक असलेल्या मिरज बसस्थानकात शुकशुकाट आहे.कर्नाटकातील एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ व अन्य मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे. यामुळे गेले दोन दिवसांपासून कर्नाटक एसटी बंद आहे. कर्नाटक सीमेलगत असलेल्या मिरजेतून जमखंडी, अथणी, बेळगाव, विजापूर, बागलकोट, उगार, कुडची, रायबाग, कागवाड येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक आहे. कर्नाटकातून मिरजेत दररोज सुमारे ३०० एसटी फेऱ्या करण्यात येत असल्याने, मिरज बसस्थानकात कर्नाटक एसटी गाड्यांची वर्दळ असते. मिरजेतून दररोज जमखंडी, अथणी, बेळगाव परिसरात ८० फेऱ्या करण्यात येतात. मात्र गेले दोन दिवस कर्नाटक एसटी बंदमुळे मिरज बसस्थानकात एसटी गाड्यांची व प्रवाशांची गर्दी कमी आहे. कर्नाटक एसटी कर्मचाऱ्यांच्या बंद आंदोलनामुळे राज्य परिवहन मंडळाने आंतरराज्य बस फेऱ्या बंद केल्या आहेत. कर्नाटकात दगडफेक व गाड्या अडविण्याच्या भीतीमुळे बसफेऱ्या बंद केल्याचे मिरज आगार व्यवस्थापक रवींद्र थलवर यांनी सांगितले. कर्नाटकात एसटी वाहतूक बंद असल्याने मिरज बसस्थानकासमोरून वडाप वाहतूक तेजीत आहे. वडापचा दर व वाहनांची संख्या वाढली असून, प्रवासी दाटीवाटीने प्रवास करीत आहेत. कर्नाटकात जाणाऱ्या-येणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू असल्याने रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी आहे. (वार्ताहर)सांगली, मिरज आगार : कोटीचे नुकसानमहाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या कर्नाटकच्या सीमा भागातील बहुतांशी गावांमध्ये बसेस रोज जात आहेत. मिरज बसस्थानकात कर्नाटक एसटी गाड्यांची वर्दळ असते. मिरजेतून दररोज जमखंडी, अथणी, बेळगाव परिसरात ८० फेऱ्या करण्यात येतात. सांगली आगारातूनही बेळगाव, विजापूर, अथणी या ठिकाणी बसेस जात आहेत. मात्र गेले दोन दिवस कर्नाटक एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनामुळे महाराष्ट्रातून जाणाऱ्या सर्व बसेसच्या फेऱ्या बंद आहेत. यामुळे सांगली, मिरज, जत, कवठेमहांकाळ आगाराचे कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे. याबद्दल संबंधित आगारप्रमुख चिंतेत आहेत.