जिल्ह्यात ३२३ जण कोरोना पॉझिटिव्ह; सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST2021-09-02T04:58:09+5:302021-09-02T04:58:09+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत बुधवारी ३२३ ने वाढ झाली. रुग्णसंख्या घटत असल्याने दिलासा मिळत असून, मृत्यूसंख्याही कमी होत ...

323 corona positive in the district; Six people died | जिल्ह्यात ३२३ जण कोरोना पॉझिटिव्ह; सहा जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ३२३ जण कोरोना पॉझिटिव्ह; सहा जणांचा मृत्यू

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत बुधवारी ३२३ ने वाढ झाली. रुग्णसंख्या घटत असल्याने दिलासा मिळत असून, मृत्यूसंख्याही कमी होत आहे. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला तर ५६४ जण कोरोनामुक्त झाले. म्युकरमायकोसिसचे दोन नवे रुग्ण आढळले.

जिल्ह्यातील सहा जणांचा मृत्यू झाला त्यात खानापूर तालुक्यातील ३, कडेगाव २ आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दिलासादायक म्हणजे महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

आरोग्य यंत्रणांना बुधवारी आरटीपीसीआर अंतर्गत ४,६०१ जणांच्या नमुने तपासणीतून १८६ जण बाधित आढळले तर रॅपिड अँटिजनच्या ५,७०६ तपासणीतून १४८ जण पॉझिटिव्ह आढळले.

उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत मोठी घट होत असून, सध्या ३ हजार १६७ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ६२२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ५२४ जण ऑक्सिजनवर तर ९८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील नवीन ११ रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १,९२,६८६

उपचार घेत असलेले ३,१६७

कोरोनामुक्त झालेले १,८४,४५९

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५,०६०

बुधवारी दिवसभरात

सांगली २६

मिरज १४

आटपाडी ४६

कडेगाव ३४

खानापूर ५६

पलूस ८

तासगाव ५३

जत २१

कवठेमहांकाळ १४

मिरज तालुका ३०

शिराळा ७

वाळवा १४

Web Title: 323 corona positive in the district; Six people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.