जिल्ह्यात कोरोनाचे ३२ बळी; ११७५ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST2021-04-25T04:27:28+5:302021-04-25T04:27:28+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या वाढतच असून, शनिवारी ११७५ जणांना कोरोनाचे निदान झाले. कोरोना झालेल्या मृतांची संख्या वाढत ...

जिल्ह्यात कोरोनाचे ३२ बळी; ११७५ नवे रुग्ण
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या वाढतच असून, शनिवारी ११७५ जणांना कोरोनाचे निदान झाले. कोरोना झालेल्या मृतांची संख्या वाढत असून, दिवसभरात तब्बल ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. खानापूर आणि आटपाडी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. ६४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
बाधितांपेक्षा कोरोनाने मृत्यूंची संख्या रोज वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारपेक्षा शनिवारी रुग्णसंख्येत घट झाली असली तरी बळींची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील सहा, तासगाव, मिरज तालुक्यांतील प्रत्येकी चार, जत, पलूस प्रत्येकी तीन, तर सांगली, मिरज शहर, आटपाडी, कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्यांत प्रत्येकी दोन, शिराळा तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने शनिवारी आरटीपीसीआर अंतर्गत २२३० जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यात ६२७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड अँटिजेनच्या ३२९७ जणांच्या तपासणीतून ६११ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येने ११ हजारांचा टप्पा पार केला असून, सध्या ११०१० जण उपचार घेत आहेत, त्यातील १७५५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात १५६४ जण ऑक्सिजनवर, तर १९१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील आठजणांचा बळी गेला असून, रुग्णसंख्येतही वाढ कायम आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ६८०४१
उपचार घेत असलेले ११०१०
कोरोनामु्क्त झालेले ५४९६१
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २०७०
शनिवारी दिवसभरात
सांगली १३३
मिरज ६५
वाळवा १४४
खानापूर १५९
आटपाडी ११६
जत १०५
तासगाव १०४
मिरज तालुका ९४
कडेगाव ८३
शिराळा ६७
कवठेमहांकाळ ५४
पलूस ५१