जिल्ह्यात ३२ नवे रुग्ण, १८ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:33+5:302021-01-08T05:29:33+5:30

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३२ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर १८ जणांनी कोरोनावर मात केली. ३८ जणांची ...

32 new patients in the district, 18 corona free | जिल्ह्यात ३२ नवे रुग्ण, १८ जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात ३२ नवे रुग्ण, १८ जण कोरोनामुक्त

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३२ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर १८ जणांनी कोरोनावर मात केली. ३८ जणांची प्रकृती चिंताजनक असून उपचाराखाली रुग्णाची संख्या दोनशेवर गेली आहे.

महापालिका क्षेत्रात मंग‌ळवारी सांगलीत ७, तर मिरजेत एका रुग्णांची नोंद झाली. आटपाडी, वाळवा व मिरज तालुक्यात प्रत्येकी १, खानापूर तालुक्यात ७, कडेगावमध्ये ५, जतमध्ये ९ रुग्ण आढळून आले. तासगाव, पलूस, शिराळा व कवठेमहांकाळ तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.

दिवसभरात आरटीपीसीआरच्या २७८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ७ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या १०१७ चाचण्यांत २८ रुग्ण सापडले. सध्या ३८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर २७, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर ३, तर नाॅन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ८ रुग्ण आहेत. कोल्हापूर, सातारा व गुजरात येथील प्रत्येकी एक रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाला आहे. सध्या परजिल्ह्यांतील १२ रुग्ण उपचाराखाली आहेत.

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

आजचे रुग्ण : ३२

उपचाराखालील रुग्ण : २०२

आजअखेर बरे झालेले रुग्ण : ४५,७५१

मृत्यू : १७३५

आजअखेरचे एकूण रुग्ण : ४७६८८

चिंताजनक : ३८

चौकट

रुग्णसंख्या अशी

सांगली : ७

मिरज : १

आटपाडी : १

कडेगाव : ५

खानापूर : ७

पलूस : ०

तासगाव : ०

जत : ९

कवठेमहाकांळ : ०

मिरज : १

शिराळा : ०

वाळवा : १

Web Title: 32 new patients in the district, 18 corona free