‘सांगली अर्बन’चे ३१,000 सभासद अपात्र

By Admin | Updated: March 3, 2015 22:34 IST2015-03-03T22:30:03+5:302015-03-03T22:34:37+5:30

प्रारूप मतदार यादी : १७ मार्च रोजी अंतिम निर्णय होणार

31,000 members of 'Sangli Urban' ineligible | ‘सांगली अर्बन’चे ३१,000 सभासद अपात्र

‘सांगली अर्बन’चे ३१,000 सभासद अपात्र

सांगली : सांगली अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेचे तब्बल ३१ हजार ३६६ सभासद निवडणुकीसाठी अपात्र ठरले आहेत. या सभासदांनी शेअर रक्कम पूर्ण केली नसून, काही सभासद थकबाकीदार आहेत. बँकेच्या प्रारूप मतदार यादीतून ही बाब निदर्शनास आली असून, त्यावर १७ मार्च रोजी अंतिम निर्णय होणार आहे. सांगली अर्बन बँकेच्या १७ संचालकांसाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. बँकेच्या सांगली, पुणे, मुंबई, मराठवाडा परिसरात ३५ शाखा असून, एकूण ५९ हजार ९७४ सभासद आहेत. सांगलीसह बीड, परभणी, माजलगाव, माणवत, परतूर, उदगीर, वसमतनगर, बार्शी, कुर्डुवाडी, हिंगोली, जालना या जिल्ह्यातही सभासद आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात २८ हजार ६०८ सभासद पात्र ठरले आहेत. नव्या सहकार कायद्यानुसार शेअर्स रक्कम पूर्ण करणे बंधनकारक आहे. थकबाकीदारांना मतदानाचा अधिकार नाही. त्या आधारावर ३१ हजार ३६६ सभासद अपात्र ठरले आहे. या मतदारयादीवर ११ मार्चपर्यंत हरकती घेता येणार असून, अंतिम मतदार यादी १७ मार्च होणार आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी बापूसाहेब पुजारी व विरोधी गणेश गाडगीळ या गटात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)

बँकेचे पात्र सभासद
शहरशाखा सभासद
सांगली शहर व जिल्हा : २०१६७६५
कोल्हापूर, जयसिंगपूर२१०३३
मराठवाडा९९६३२
पुणे, मुंबई, चिंचवड४११८७

Web Title: 31,000 members of 'Sangli Urban' ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.