शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील भाजप खासदारांच्या सुरक्षारक्षकाकडून जमीन व्यवहारात ३१ लाखांचा गंडा, बारा जणांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 12:24 IST

करारपत्रावरील व्यक्तीही बोगस

सांगली : शेतजमीन देण्याच्या आमिषाने एकास ३१ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलिसासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी जयदेव रामचंद्र काळे (रा. जायगव्हाण, ता. कवठेमहांकाळ) यांनी पोलिस कर्मचारी कृष्णदेव रामचंद्र पाटील (वय ३५, रा. वायफळे, ता. तासगाव), विनायक रामचंद्र सुतार (३४, रा. वासुंबे, ता. तासगाव), अरविंद मच्छींद्र पाटील (३५, रा. बलगवडे, ता. तासगाव) आणि सुधीर ऊर्फ भय्या शिंगाटे (रा. पंढरपूर) यांच्यासह अनोळखी आठ जणांविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिघांना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जानेवारी २०१८ मध्ये संशयितांनी फिर्यादी काळे यांना तासगाव ते कुमठा फाटा मार्गावर रसूलवाडी रस्त्यावरील आठ एकर १६ गुंठे जमिनीची विक्री करायची असून, ती खरेदी करण्याची गळ घातली होती. यावेळी काळे यांनी त्यांचे मित्र विजय चव्हाण यांना ही जमीन दोघांत घेऊ, असे सांगत पुढील व्यवहार केले होते.यात खरेदीची इसारत रक्कम म्हणून १ लाख रुपये आणि सात-बारा उताऱ्यावरील बँकेचा बोझा कमी करण्यासाठी २४ लाख आणि धनादेशाने ६ लाख असे एकूण ३१ लाख रुपये दिले होते. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही व्यवहार होत नसल्याने पैसे परत देण्यासाठी पाठपुरावा केला; मात्र पैसे मिळाले नसल्याने अखेर त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सर्व संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करारपत्रावरील व्यक्तीही बोगससंशयित चौघांनी शेतजमिनीच्या करारावर अमित मनोहर मुळे, अभिजित मनोहर मुळे, आशालता मनोहर मुळे, जिवंधर भूपाल मुळे, सुकुमार भूपाल मुळे, उत्तम भूपाल मुळे, युगंधर श्रीपाल मुळे, चंद्रकांत श्रीपाल मुळे यांचे फोटो लावले होते. मुळे हेच शेतजमिनीचे मालक आहेत, अशी ओळख करून देण्यात आली होती.

संशयितांना पाच दिवसांची कोठडीया गुन्ह्यात पोलिस कृष्णदेव पाटील याच्यासह विनायक सुतार, अरविंद पाटील यांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सर्वांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी