शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना ३०८ कोटींचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 16:25 IST

शेती कर्जामध्ये मध्यम व दीर्घ मुदत द्राक्षबागासाठी ३८६ सभासदांना आठ कोटी १९ लाख रुपये मंजूर

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ३४६.०८ कोटीच्या अल्प व मध्यम मुदत कर्जास मंजुरी देण्यात आली. यामध्ये विश्वासराव नाईक, दत्त इंडिया, कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती, दूधगंगा- वेदगंगा या चार साखर कारखान्यांना ३०८ कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. बँक अध्यक्ष तथा आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.कर्ज समितीच्या बैठकीत बिगर शेती कर्जे २८ कोटी २९ लाखाची मंजूर केली आहेत. यामध्ये १०३ बचतगटासाठी एक कोटी ५० लाख, मध्यम मुदत वाहन कर्जासाठी एक कोटी २३ लाख, पगारदारांच्या ४१ नोकरांच्या संस्थांसाठी दोन कोटी २८ लाख, बॅंक सेवकांना घरबांधणीसाठी मुदत कर्जासाठी एक कोटी १५ लाख, दीर्घ मुदतीत शेतकऱ्यांना घर बांधणीसाठी पाच कोटी ६७ लाख, मालमत्ता तारणावर दोन कोटी ३२ लाख, थेट कर्जपुरवठा योजनेअंतर्गत संस्थेचे ग्रीन कॅश क्रेडिट चार कोटी असा बिगर शेतीचा एकूण कर्जपुरवठा २८ कोटी २९ लाख रुपयांचा करण्यात आला आहे.या बैठकीस जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, आमदार अनिल बाबर, प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, राहुल महाडिक, बाळासाहेब व्हनमोरे, सुरेश पाटील, बी.एस. पाटील, वैभव शिंदे, संग्राम देशमुख, महेंद्र लाड, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.द्राक्षबागासाठी आठ कोटी १९ लाखशेती कर्जामध्ये मध्यम व दीर्घ मुदत द्राक्षबागासाठी ३८६ सभासदांना आठ कोटी १९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शेतजमीन खरेदीसाठी ३१ लाख, विकास सोसायटी यांना गाळा बांधकामासाठी २० लाख रुपये, नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत १८ लाख असा नऊ कोटी ७८ लाखाचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. साखर कारखान्यांसाठी ३०८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकSugar factoryसाखर कारखाने