कापूरवाडीत दुकान फोडून ३० हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST2021-02-14T04:25:20+5:302021-02-14T04:25:20+5:30

इस्लामपूर : पेठ-सांगली रस्त्यावरील कापूरवाडी गावच्या हद्दीत असणा-या फर्निचरच्या दुकानात चोरी झाली. चोरट्यांनी दुकानातील तांब्याची भांडी आणि इतर साहित्य ...

30,000 stolen from shop in Kapurwadi | कापूरवाडीत दुकान फोडून ३० हजारांची चोरी

कापूरवाडीत दुकान फोडून ३० हजारांची चोरी

इस्लामपूर : पेठ-सांगली रस्त्यावरील कापूरवाडी गावच्या हद्दीत असणा-या फर्निचरच्या दुकानात चोरी झाली. चोरट्यांनी दुकानातील तांब्याची भांडी आणि इतर साहित्य अशा ३० हजार रुपयांच्या वस्तू लंपास केल्या. ही घटना शुक्रवारी रात्री ते पहाटेदरम्यान घडली. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत राहुल शंकर मोहिते (२६, केदारवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

मोहिते यांच्या नातेवाइकांचे रोहित फर्निचर नावाचे दुकान कापूरवाडी गावच्या हद्दीत आहे. ते दुकान राहुल मोहिते चालवतात. शुक्रवारी सायंकाळी ते दुकान बंद करून गेले होते. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास आल्यावर त्यांना हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला. चोरट्यांनी पाठीमागील बाजूने पत्रा आणि दरवाजा कापून आत प्रवेश करून दुकानातील तांब्याची भांडी, पंचपाळे, पिंप, ब्रेसलेट, देवपूजेची भांडी, शेवगा, कळशी, रजई आणि मिक्सर अशा साहित्यांची चोरी केली.

Web Title: 30,000 stolen from shop in Kapurwadi