मिरजेत बंगला फोडून ३० हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:31 IST2021-08-24T04:31:20+5:302021-08-24T04:31:20+5:30
मिरज : मिरजेत दिंडीवेस साई कॉलनीत बंद बंगल्याच्या दरवाजाची जाळी तोडून घरातील ३० हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. या ...

मिरजेत बंगला फोडून ३० हजार लंपास
मिरज : मिरजेत दिंडीवेस साई कॉलनीत बंद बंगल्याच्या दरवाजाची जाळी तोडून घरातील ३० हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. या परिसरात आणखी एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
दिंडीवेस येथील राजाराम तुकाराम पवार हे कुटुंबासोबत कामानिमित्त परगावी गेले होते. रविवारी दुपारी ते घरी आल्यानंतर तिजोरी व कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसले. चोरीबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. राजाराम पवार यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाला कुलूप घातले होते. घराच्या मागील बाजूस असलेल्या दरवाजाची जाळी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील तिजोरीत असलेले ३० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. पवार यांनी घरातील सोन्याचे दागिने सोबत नेल्याने दागिने बचावले. घराशेजारी असलेल्या बबन मोरे यांच्या बंगल्यातही चोरीचा प्रयत्न झाला. मोरे कुटुंबीय जागे झाल्याने चोरट्यांनी पलायन केले. मिरज शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.