अभयनगरला फ्लॅट फोडून ३० हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST2021-09-06T04:29:31+5:302021-09-06T04:29:31+5:30

सांगली : शहरातील अभयनगर येथील स्टेट बँक कॉलनी परिसरातील फ्लॅट फोडून चोरट्यांनी ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी ...

30,000 lamps were blown up in Abhaynagar | अभयनगरला फ्लॅट फोडून ३० हजार लंपास

अभयनगरला फ्लॅट फोडून ३० हजार लंपास

सांगली : शहरातील अभयनगर येथील स्टेट बँक कॉलनी परिसरातील फ्लॅट फोडून चोरट्यांनी ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी अकबर वजीर खलीफा (रा.सुभाष प्लाझा, अभयनगर) यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार दि. ३ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी खलीफा पत्वीन व मुलीसह नातेवाइकाकडे गेले होते. या कालावधीत कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी लॉक तोडून आत प्रवेश करत, रोख दहा हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याच वेळी चोरट्यांनी दुसराही एक फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न केला, तर याच ठिकाणी राहणारे अन्सार आब्बास चौगुले यांनी रस्त्याकडेला पार्क केलेल्या मोटारीचे चाकेही चोरून नेली. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क केला.

Web Title: 30,000 lamps were blown up in Abhaynagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.