ताकारी येथील एकाची ३० हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:33 IST2021-09-16T04:33:47+5:302021-09-16T04:33:47+5:30
इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा) येथील एकास लग्नाचे कपडे काढण्याचे आमिष दाखवत सातारा येथील दोघांनी ३० हजार रुपयांचा गंडा ...

ताकारी येथील एकाची ३० हजारांची फसवणूक
इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा) येथील एकास लग्नाचे कपडे काढण्याचे आमिष दाखवत सातारा येथील दोघांनी ३० हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार जुलै महिन्यात घडला आहे. याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस या बंटी-बबलीच्या शोधासाठी साताऱ्यात तळ ठोकून बसले होते.
सुनील राजाराम पाटील (३०, रा. ताकारी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून श्वेता अतुल जगताप आणि अरुण जाधव (दोघे रा. सातारा) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दोघांनी पाटील यांचे लग्न ठरवले होते. त्यामुळे लग्नाचे कपडे काढण्यासाठी त्यांनी पाटील यांच्याकडून ३० हजार रुपये घेतले. ही रक्कम पाटील यांनी इस्लामपूर शहरातील एका सर्व्हिस सेंटरवरून ऑनलाईन पद्धतीने दोघांच्या बँक खात्यावर जमा केले होते. मात्र त्यांनी दिलेला पत्ता खोटा होता. तसेच मोबाईल नंबर बंद होते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस नाईक शरद बावडेकर अधिक तपास करत आहेत.
चाैकट
अनेकांना गंडा..!
श्वेता आणि अरुण या जोडगोळीने अनेकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात या दोघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके त्या परिसरात शोधमोहीम राबवत आहेत.