शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेचे ३० हजार शेतकरी होणार कर्जमुक्त, ७४३ कोटींच्या वसुलीसाठी ओटीएस योजना

By अशोक डोंबाळे | Updated: June 11, 2024 17:11 IST

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाच्या वसुलीसाठी एकरकमी कर्जवसुली योजना (ओटीएस) सुरू केली आहे. जूनअखेरची पीककर्जाची ...

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाच्या वसुलीसाठी एकरकमी कर्जवसुली योजना (ओटीएस) सुरू केली आहे. जूनअखेरची पीककर्जाची सुमारे ७४३ कोटी थकबाकी आहे. जिल्ह्यात सुमारे ३० हजार थकबाकीदार शेतकरी असून, त्यांना ३० जूनअखेर ओटीएस योजनेचा लाभ घेता येणार आहे. यानिमित्ताने वर्षानुवर्षे थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.जिल्हा बँकेचा एनपीए १४ टक्क्यांवर गेला होता. मात्र गेल्या दोन वर्षात बँकेने थकबाकी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवत बिगरशेतीसह शेती कर्जाला एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजना सुरू केली. बँकेचा एनपीए कमी करण्यासाठी अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात बँकेचा एनपीए ५ टक्क्याच्या आत आणण्याचा निर्धार केला आहे.

शेती कर्जाच्या वसुलीवर शिवाजीराव वाघ यांनी मागील वर्षभरापासून विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांनी ओटीएस योजनेचा लाभ घेत थकबाकी भरावी. यासाठी वाघ यांनी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांना तालुक्यात पाठवून शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास भाग पाडले होते. शेती कर्जाची सर्वाधिक थकबाकी जत तालुक्यातील वसुलीसाठी जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाला लावले. गतवर्षी याचे चांगले परिणाम दिसून आले होते. त्यामुळे पुन्हा ओटीएस योजना लागू केली.पीककर्जाच्या वसुलीसाठी बँकेने तालुकानिहाय आणि शाखानिहाय कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिले होते. यामध्ये सर्वाधिक वसुली कडेगाव तालुक्यातून ९९.९० टक्के झाली आहे. त्याखालोखाल वाळव्यातून ८६.८६ टक्के झाली आहे. सर्वात कमी जत तालुक्यातून ४७ टक्के झाली आहे. वसुलीमध्ये पलूस ७३ टक्के, शिराळा ७८, आटपाडी ७७, खानापूर ७४, तासगाव ५९, कवठेमहांकाळ ५८.७६ आणि मिरज ६६ टक्के वसुली झाली आहे. उर्वरित वसुलीला ओटीएसचा आधार मिळण्याच्या आशा आहेत. पीक कर्जाच्या ओटीएस योजनेमुळे जिल्ह्यातील थकबाकीदार सुमारे ३० हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याची संधी मिळणार आहे.

शेतकऱ्यांना व्याजमाफी मिळणार : मानसिंगराव नाईकजिल्हा बँकेने यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या ओटीएस योजनेमुळे थकबाकी वसुलीत वाढ झाली आहे. त्या धर्तीवर पुन्हा थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ओटीएस योजना सुरू केली आहे. ओटीएस अंतर्गत व्याज माफी शेतकऱ्यांना देण्यात येईल. या व्याज माफीची तरतूद बँकेच्या नफ्यातून करणार आहे. मार्च २५ अखेर बॅँकेचा एनपीए ५ टक्क्याच्या आत आणण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली.

बँकेकडून १५० कर्मचाऱ्यांची नियुक्तीजिल्हा बँकेने वाटप केलेल्या पीककर्जापैकी जुनी आणि चालू मिळून सुमारे दोन हजार २३७ कोटी थकबाकी होती. पैकी एक हजार ४९४ कोटी मार्चअखेर वसुली केली. जूनअखेर ७४३ कोटी वसुली शिल्लक आहे. या वसुलीसाठी बँकेने १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. थकबाकी न भरणाऱ्यांवर बँकेकडून कारवाई होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकFarmerशेतकरी