शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात ३० कारवाया, ५० आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:09 IST

कायद्याचा धाक, प्रबोधनामुळे अमली पदार्थसंबंधी गुन्ह्यांना आळा

सांगली : दोन महिन्यांत पोलिस विभागाने अमली पदार्थांविरोधात ३० कारवाया केल्या असून, ५० आरोपींना अटक केली आहे. जिल्ह्यातील गुन्हे व अमली पदार्थविषयक गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. म्हणूनच जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी गुन्ह्यांना आळा बसला, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच अमली पदार्थ तस्करांची पाळेमुळे खणून काढून जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्यासाठी नियमित कारवाई करावी, अशा सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सूचनाही त्यांनी दिल्या.जिल्हा परिषदेत सोमवारी अमली पदार्थ टास्क फोर्सची बैठक झाली. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रितू खोखर, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, राजेसाहेब लोंढे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील गुन्हे व अमली पदार्थविषयक गुन्हे नियंत्रणात आले आहेत. कायद्याचा धाक, प्रबोधन आणि व्यसनाधिनांना त्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन उपचार केंद्र अशा सर्व आघाड्यांवर जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे.

७६ व्हिडीओ पार्लरची तपासणी पूर्ण : अशोक काकडेजिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यातील ७७ पैकी ७६ व्हिडीओ पार्लरची तपासणी पूर्ण झाली आहे. याठिकाणी संबंधितांना पार्लरमध्ये कोणताही गैरकारभार होता कामा नये, याविषयी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मद्यविक्रेत्यांना नोटीस काढाचंद्रकांत पाटील म्हणाले, मद्यविक्री दुकानांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमावली तयार करावी. मद्यविक्री दुकाने अशा गुन्ह्यांची केंद्रे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्यासाठी मद्यविक्री दुकान मालकांना त्यांच्या दुकानाच्या परिसरात गुन्ह्यांना प्रवृत्त करणारे वातावरण होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यासह दंडाबाबत नोटीस काढावी.

अमली पदार्थमुक्त अभियानउच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शासकीय व खासगी तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनीही तंबाखूमुक्त शाळांप्रमाणे अमली पदार्थविरोधी प्रबोधनासाठी विशेष अभियान राबविण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसchandrakant patilचंद्रकांत पाटील