शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

राजारामबापू कारखान्याकडून ३0 कोटींचा अपहार : गौतम पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 15:09 IST

राजारामबापू पाटील कारखान्याने सर्वोदय कारखान्याच्या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रे, लेटरहेड, शिक्के आणि बनावट सह्या करुन सर्वोदयच्या नावाने पेट्रोलियम पदार्थांची खरेदी, तर राजारामबापू कारखान्याच्या नावाने विक्री करून २५ ते ३0 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप माजी नगरसेवक गौतम पवार यांनी केला. ही फसवणूक आणि अपहाराबद्दल येत्या चार दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास आष्टा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

ठळक मुद्देराजारामबापू कारखान्याकडून ३0 कोटींचा अपहार माजी नगरसेवक गौतम पवार यांनी केला आरोप

इस्लामपूर : राजारामबापू पाटील कारखान्याने सर्वोदय कारखान्याच्या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रे, लेटरहेड, शिक्के आणि बनावट सह्या करुन सर्वोदयच्या नावाने पेट्रोलियम पदार्थांची खरेदी, तर राजारामबापू कारखान्याच्या नावाने विक्री करून २५ ते ३0 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप माजी नगरसेवक गौतम पवार यांनी केला. ही फसवणूक आणि अपहाराबद्दल येत्या चार दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास आष्टा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.येथील भाजपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीत पवार बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष व जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष निशिकांत पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.पवार म्हणाले, सर्वोदय कारखान्याच्या पेट्रोल पंपावरील अपहारप्रकरणी राजारामबापू कारखान्याच्या सर्व संचालकांसह कार्यकारी संचालक आणि सरव्यवस्थापक जबाबदार आहेत. या सर्वांनी संगनमत करुन २५ ते ३0 कोटी रुपयांचा अपहार केला आहे. पेट्रोलियम पदार्थांची व उपपदार्थांची खरेदी सर्वोदय कारखाना करत असल्याचे भासवून इंडियन आॅईल कॉर्पोरेशनचीही फसवणूक केली आहे. याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला आहे.ते म्हणाले, आमदार जयंत पाटील यांनी भावनिक होऊन आमच्या कारखान्याशी करार केला होता. त्यानंतर काही काळातच करारातील नियमावली पाळली नाही. कराराप्रमाणे देय असणारी रक्कम देण्याची तयारी होती. मात्र त्यांनी टाळाटाळ केली. पुढे जबरदस्तीने कायद्याचे व कराराचे उल्लंघन करुन कारखान्यासह संबंधित संस्थाही ताब्यात घेतल्या. उच्च न्यायालयाने, सर्वोदयप्रकरणी महाराष्ट्र शासनाने निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले.

त्यानुसार शासनाने हा कारखाना कायदेशीररित्या आमच्या ताब्यात देण्यासाठी प्रक्रिया सुरु केली. मात्र या प्रक्रियेला स्थगिती मळविण्यासाठी राजारामबापूच्या व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेथेही त्यांचे वकील वेगवेगळी कारणे सांगून गैरहजर राहत आहेत. या हंगामात कारखाना सुरू होेऊ नये, असा त्यांचा प्रयत्न आहे. ऊस उत्पादक व कामगारांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत हा हंगाम आम्ही सुरु करणार आहोत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली