शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
2
Video: धक्कादायक! जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
3
चीन सोबत डील, पॉलिसीमध्ये बदल; ट्रम्प यांनी हार मानली का? अचानक का बदलले त्यांचे सूर
4
करण जोहर दिवसेंदिवस होत चाललाय बारीक, अवस्था पाहून चाहते चिंतेत, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाला…
5
मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा
6
जगभर: मोकळा आणि प्रदूषणमुक्त श्वास, पॅरिसमधले ५०० रस्ते फक्त चालण्यासाठी!
7
अमेरिकेत भारतीय विद्यार्थी सरकारच्या टार्गेटवर, व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये ५० टक्के भारतीय
8
World Press Photo of the Year: आई, आता मी तुला मिठी कशी मारू?
9
हृदयद्रावक! ऑटोतून आईसोबत खाली उतरला अन ट्रकने चिमुकल्याला चिरडले; घटनेनंतर तणावाचे वातावरण
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
11
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!
12
अग्रलेख: वक्फ कायद्याला झटका, ...तर नव्या कायद्याचा उद्देशच नष्ट होईल
13
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
14
टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली
15
ठाणे: 'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातून सुटका केलेल्या मुलांनी सांगितली आपबीती
16
सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
17
‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
18
टॅरिफने अर्थव्यवस्था कमकुवत, महागाई वाढेल, पण मंदी नाही : जॉर्जीव्हा
19
विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धाचे भारताला किती चटके?
20
नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Sangli: शेअर मार्केट कंपनीकडून तीन कोटींची फसवणूक, जत तालुक्यातील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 13:38 IST

पाच जणांवर गुन्हा दाखल

जत : श्री हाय टेक ट्रेडर्स या कंपनीच्या माध्यमातून दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून तिघांची तीन कोटी ४४ हजार ४९५ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखाच्या माध्यमातून चौकशी करून शुक्रवारी, दि. १ डिसेंबर रोजी जत पोलिस ठाण्यात पाचविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सोमनाथ रानगट्टी (रा. जत) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजयकुमार एम. बिरजगी (वय ३९, रा. मॅगोनेस्ट सोसायटी ए- २०८ सिंहगड रोड पुणे), आनंद बसाप्पा बसरगी (वय ४५, रा. डायरी, गांव धाराशिव मंदिर जवळ, नेर पुणे), बापुराय रामगोंडा बिरादार (४२, रा. भिवरगी फाटा संख, ता. जत), शोभा बापुराय बिरादार (३४, रा. भिवर्गी, ता. जत) व अनिता विजयकुमार बिराजदार (३२, रा. मॅगोनेस्ट सोसायटी, सिंहगड रोड पुणे), अशा पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.श्री हाय टेक ट्रेडर्स कंपनीचे प्रोप्रा. विजयकुमार बिरजगी याने फिर्यादी सोमनाथ रानगट्टी यांच्या बँक खात्यावरून एक ८८ लाख दोन हजार ४९५ रुपये, प्रदीप पुजारी यांची ३६ लाख ८० हजार व महांतेश आडव्याप्पा डोणुर यांची ७५ लाख ६२ हजार रुपये रकमेस अशी तीन कोटी ४४ हजार ४९५ रुपये श्री हाय टेक ट्रेडर्स कंपनीमध्ये रक्कम गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त रक्कम परतावा देणेची खात्रीशीर हमी देऊन व आमिष दाखविले व त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. शिवाय, फिर्यादी व सहकाऱ्यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्यांचे बँक खाते पैसे भरले.दरम्यान, काही कालावधीनंतर कंपनीकडून आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सांगली पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची भेट घेत हा प्रकार सांगितला. त्यांनी ही केस सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली. यावर विभागाने याची चौकशी करून आज जत पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी