शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू उपसा सिंचन योजनेस द्व‍ितीय सुधारित प्रशासकीय मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 19:04 IST

सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील एकूण ७ तालुक्यांच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ४ हजार ८८  कोटी ९४ लाख रुपयांच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत द्व‍ितीय सुधारित प्रशासकीय मान्यतादेण्यात आली. या मान्यतेमुळे अवर्षण प्रवण भागातील २४० गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे.

ठळक मुद्देटेंभू उपसा सिंचन योजनेस द्व‍ितीय सुधारित प्रशासकीय मान्यताएकूण ९९.२५  टक्के सिंचन क्षेत्र अवर्षण प्रवण भागातील

सांगली : सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील एकूण ७ तालुक्यांच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ४ हजार ८८  कोटी ९४ लाख रुपयांच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत द्व‍ितीय सुधारित प्रशासकीय मान्यतादेण्यात आली. या मान्यतेमुळे अवर्षण प्रवण भागातील २४० गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे.महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत उर्वरित महाराष्ट्र प्रदेशामध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेचा समावेश होतो. कोयना, वांग व तारळी धरण तसेच कृष्णा नदीतील मान्सुनोत्तर प्रवाह मिळून २२ अब्ज घनफूट पाण्याचा वापर या प्रकल्पात विविध टप्प्‍यांमध्ये करण्यात येणार आहे. कृष्णा नदीवर टेंभू गावाजवळ बॅरेज बांधून विविध टप्प्यांद्वारे हे पाणी उचलण्यात येईल.

सातारा जिल्ह्यातील कराड तालुका (६०० हेक्टर), सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी व कवठेमहांकाळ तालुके (५९ हजार ८७२ हेक्टर) तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका (२० हजार हेक्टर) अशा एकूण ७ तालुक्यांतील २४० गावांतील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्रास पाणी पुरवले जाणार आहे. सिंचनाचा हा लाभ ४५० किलोमीटर लांबीच्या कालव्यांद्वारे देण्यात येईल. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील एकूण ९९.२५  टक्के सिंचन क्षेत्र हे अवर्षण प्रवण भागातील आहे.प्रकल्पाच्या प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार, योजनेतील खुल्या कालव्याद्वारे सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजित होते. आता द्व‍ितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये प्रकल्पांतर्गत ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्रापैकी ७५ हजार २०१ हेक्टर ( ९३.४५  टक्के) क्षेत्रासाठी बंदिस्त नलिका पद्धतीने पाणी वितरण करण्यात येईल. हे पाणी विविध साठवण तलावात सोडून तेथून लाभार्थ्यांनी स्वखर्चाने पाण्याचा उपसा करून सिंचन करणे नियोजित आहे.

या योजनेसाठी १९ फेब्रुवारी १९९६  रोजी १९९५ -१९९६ च्या दरसूचीवर आधारित १  हजार ४१६ कोटी ५९ लाख रुपये इतक्या किंमतीस मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तर २२ जानेवारी २००४ रोजी २०००-०१ च्या दरसूचीवर आधारित २ हजार १०६  कोटी ९ लाख रुपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.दरम्यानच्या कालावधीत दरसूचीतील दरात वाढ, भूसंपादन खर्चात वाढ (विशेषत: नवीन भूसंपादन कायद्यामुळे), संकल्पचित्रातील बदलामुळे वाढ, नवीन/वगळलेल्या तरतुदी, अपुऱ्या तरतुदी व इतर कारणांमुळे वाढ तसेच अनुषंगिक खर्चामुळे (आस्थापना व हत्यारे-संयंत्रे) प्रकल्प किंमतीत वाढ झाली आहे.

बांधकामाची सद्य:स्थिती, किंमत वाढीची कारणमिमांसा, प्रकल्पाची उर्वरित कामे यांचा आढावा घेऊन आणि संबंधित अवर्षणप्रवण तालुक्यातील क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्यासाठी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेता यावे, या उद्देशाने ही द्व‍ितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये यापूर्वीच टेंभू प्रकल्पाचा समावेश झाला आहे.

टॅग्स :Tembhu Projectटेंभू धरणSangliसांगली