शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली लोकसभेसाठी दुपारी १ वाजेपर्यंत २९.६५ टक्के मतदान; शांघायमधून येऊन 'तसनीम'ने बजावला मतदानाचा हक्क

By अशोक डोंबाळे | Updated: May 7, 2024 14:14 IST

उन्हामुळे काही मतदान केंद्रे ओस

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळपासून उत्साहात मतदान सुरू झाले आहे. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच्या २९.६५ टक्के मतदान झाले होते. मतदान केंद्रावर नवमतदार, ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसत आहे; पण दुपारी १२ वाजल्यापासून काही मतदान केंद्रे उन्हामुळे ओस पडलेली दिसत आहेत.सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदानाचा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत मतदारसंघात सरासरी २९.६५ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. साडेनऊनंतर मतदानात मोठी वाढ झाली आहे. सध्या कुपवार, सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहाने मतदान होत आहे.शांघायमधून येऊन तसनीमने बजावला मतदानाचा हक्कअडीच महिन्याच्या जुळ्या मुलासह तसनीम कालेकर (शांघाय, चीन) येथून खास मतदान करण्यासाठी आल्या आहेत. त्यांनी पलुस येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तसनीमचा आदेश घेऊन शहरातील मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडतील का? अशी मतदान केंद्रावर चर्चा होती.

सांगली लोकसभेसाठी दुपारी १ वाजेपर्यंतचे मतदान विधानसभा मतदारसंघ मताची टक्केवारी

  • जत २९.५५
  • खानापूर २७.८४
  • मिरज ३१.७०
  • पलुस -कडेगाव २६.८०
  • सांगली ३२.९६
  • तासगाव -कवठेमहांकाळ २८.५४
टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान