२९ मोबाईल टॉवर सील

By Admin | Updated: June 19, 2014 00:57 IST2014-06-19T00:56:32+5:302014-06-19T00:57:13+5:30

साडेचार लाखांची वसुली : कंपन्यांची धावाधाव

29 Mobile Tower Seal | २९ मोबाईल टॉवर सील

२९ मोबाईल टॉवर सील

सांगली : महापालिकेने विनापरवाना मोबाईल टॉवरवर सलग दुसऱ्यादिवशी कारवाईची मोहीम सुरूच ठेवली. आज, बुधवारपर्यंत २९ टॉवर सील करण्यात आले. त्यापैकी तीन टॉवरच्या कंपन्यांनी साडेचार लाख रुपयांचा कर भरला आहे. पालिकेच्या कारवाईने मोबाईल कंपन्यांची धावाधाव सुरू झाली आहे.
महापालिका हद्दीत २०० टॉवर्स आहेत. त्यापैकी ५७ जणांनी परवाना घेतला आहे, तर ७० प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. उर्वरित ६४ टॉवर्स विनापरवाना सुरू आहेत. काल, मंगळवारी स्थायी समितीत टॉवरवरील कारवाईवरून झालेल्या गदारोळानंतर प्रशासनाला जाग आली. टॉवर सील करण्यासाठी उपायुक्त सुनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली चार प्रभागांसाठी चार पथके तयार करण्यात आली. काल रात्री उशिरापर्यंत १३ टॉवर सील केले होते. आज दुसऱ्यादिवशीही प्रशासनाने कारवाई सुरूच ठेवली.
दिवसभरात एकूण २९ टॉवर्स सील करण्यात आले. त्यातील तीन टॉवरपोटी मोबाईल कंपन्यांनी साडेचार लाख रुपये भरले. त्यानंतर या टॉवरचे सील काढण्यात आले. बीएसएनएलने अकरा टॉवरची रक्कम भरण्यासाठी महापालिकेकडे दोन दिवसांची मुदत मागितली आहे. पालिकेनेही बीएसएनएलला मुदत दिली असून, त्यांच्याकडून दोन दिवसात २८ लाख रुपये वसूल होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
टॉवर्स सील केले असले तरी, बॅटरी बॅकअप्मुळे दोन दिवस शहरातील नेटवर्क सुरू राहील. त्यानंतर नेटवर्क बंद पडणार असल्याने कंपन्यांची धावाधाव सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 29 Mobile Tower Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.