जिल्ह्यात २८० जण कोरोना पॉझिटिव्ह; पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST2021-09-12T04:31:04+5:302021-09-12T04:31:04+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर होत असतानाच, शनिवारी नवीन २८० रुग्ण आढळले. परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला, ...

जिल्ह्यात २८० जण कोरोना पॉझिटिव्ह; पाच जणांचा मृत्यू
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर होत असतानाच, शनिवारी नवीन २८० रुग्ण आढळले. परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला, तर ३८७ जण कोरोनामुक्त झाले. म्युकरमायकोसिसचा नवीन एक रुग्ण आढळला, तर एकाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील ४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला त्यात सांगली, कडेगाव, वाळवा आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत घट होत असून सध्या १९१९ जण उपचार घेत आहेत. त्यातील ५११ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४२० जण ऑक्सिजनवर, तर ९१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआरअंर्तगत २४०० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात १०६ बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ४५३९ जणांच्या नमुने तपासणीतून १७७ जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू, तर नवीन तिघे उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १९५५९४
उपचार घेत असलेले १९१९
कोरोनामुक्त झालेले १८८५२६
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५१४९
शनिवारी दिवसभरात
सांगली ४७
मिरज ५
आटपाडी ४३
कडेगाव २०
खानापूर ४८
पलूस १६
तासगाव ३२
जत १४
कवठेमहांकाळ १३
मिरज तालुका १६
शिराळा ३
वाळवा २३