जिल्हाभरात २७ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST2021-08-13T04:30:25+5:302021-08-13T04:30:25+5:30
सांगलीत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तापमान तपासणी करूनच वर्गात सोडण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पाचवी आणि आठवीची पूर्व ...

जिल्हाभरात २७ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
सांगलीत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तापमान तपासणी करूनच वर्गात सोडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पाचवी आणि आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुरुवारी जिल्हाभरात पार पडली. २७ हजार विद्यार्थ्यांनी ती दिली. कोरोनामध्ये शाळा बंद असल्याच्या स्थितीत ऑफलाइन स्वरूपात परीक्षा झाली. पाचवीसाठी १८ हजार १६९ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती, त्यापैकी १६ हजार ६२३ जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. आठवीला ११ हजार ३२६ पैकी १० हजार ४५१ विद्यार्थी परीक्षेसाठी आले. प्रत्येक इयत्तेचे दोन-दोन पेपर झाले. महापालिका क्षेत्रात पाचवीच्या १ हजार ५४१ विद्यार्थ्यांनी तर आठवीच्या ९५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांनी शाळांच्या गेटवर गर्दी केली होती.
गेली दीड वर्षे शाळा बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत एकत्र आले होते. आजवर विविध परीक्षा ऑनलाइन स्वरूपातच झाल्या किंवा मूल्यांकनाद्वारे निकाल जाहीर केले गेले. आजची शिष्यवृत्ती परीक्षा मात्र ऑफलाइन स्वरूपात झाल्याने कोरोनाची खबरदारी घेण्यात आली होती. प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करूनच वर्गात सोडण्यात आले. मास्क सक्तीचा केला होता.