शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापूर नियंत्रणासाठी २७ पानी अहवाल सादर, सांगलीत आजपासून साखळी उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 13:31 IST

प्रशासनाचा हलगर्जीपणा ठरतोय मारक

सांगली : सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील महापूर नियंत्रणासाठी नागरी कृती समितीने २७ पानांचा अभ्यास अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यातील शिफारशींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून (दि. २२) कार्यकर्ते व पूरग्रस्त भागातील नागरिक सांगलीत साखळी उपोषण करणार आहेत.सकाळी ११ वाजता आरती गणपती करून मंदिरासमोर आंदोलनाची सुरुवात होईल. समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी सांगितले की, महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्राची अब्जावधी रुपयांची हानी झाली आहे. महापुरावर नियंत्रण करता येऊ शकते असा समितीचा दावा आहे. त्यासाठी शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे. अभ्यासाअंती आढळलेली निरीक्षणे, उपायांचा अहवाल मुख्य सचिव व जलसंपदाच्या सचिवांना सादर केला आहे. त्यातील शिफारशींची अंमलबजावणी केल्यास पूर नियंत्रण आणता येईल. त्यासाठी बिनखर्चाचे आणि खर्चाचेही पर्याय सुचविले आहेत.पाटील म्हणाले, अहवालासाठी जलअभ्यासक, शास्त्रज्ञ, अभियंते, स्पंदन संस्था, आंदोलन अंकुश, शिवाजी विद्यापीठ, ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव, ड्रोन सर्वेक्षण, कंटूर सर्वेक्षण, प्रत्यक्ष नदीकाठावरील परिस्थितीचा अभ्यास आदींचा आधार घेतला आहे. त्यातील शिफारशी वास्तवाशी निगडीत आहेत. राज्य शासन व पाटबंधारेने काही शिफारशींची अंमलबजावणी केली, मात्र बऱ्याच बाबींवर कार्यवाही झालेली नाही.याकडे लक्ष वेधण्यासाठीच नागरी साखळी उपोषणाची हाक दिली आहे. शिरोळमधून "आंदोलन अंकुश" चे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. यावेळी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, हणमंतराव पवार, संजय कोरे, नीलेश पवार, सचिन सगरे, दिनकर पवार आदी उपस्थित होते.

प्रशासनाचा हलगर्जीपणा ठरतोय मारक

समितीने दावा केला की, धरण व्यवस्थापनाविषयी केंद्र सरकारच्या काही नियमांवर अंकुश गरजेचा आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्याची व जिल्ह्याची महापूर नियंत्रण सुरक्षा समिती अद्याप गठीत केलेली नाही. अलमट्टी धरणातील पाणीसाठा व विसर्गाविषयी नियमांचे पालन कर्नाटक सरकार करत नाही. धरणांच्या एकात्मिक व्यवस्थापनाकडे कानाडोळा केला जातो. सांगलीत शामरावनगरमध्ये गेल्या पावसाळ्यातील पाण्याचा निचरा अजूनही झालेला नाही. नाले स्वच्छ केलेले नाहीत. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाखालून पाण्याला वाट ठेवलेली नाही. बेंच मार्क चुकीचे आहेत. बंधाऱ्यांतील बरंगे पावसाळ्यापूर्वी वेळेवर काढले व बसविले जात नाहीत..

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरfloodपूर