शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

सांगली जिल्ह्यात २६ पासून होणार ‘स्वच्छतेचा महाजागर’ : अभिजित राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:21 PM

अस्वच्छताच अनेक आजारांना निमंत्रण देत असल्यामुळे, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागृती होण्याची नितांत गरज आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद व वारकरी साहित्य परिषदेचा संयुक्त उपक्रम६९९ गावांमध्ये होणार प्रवचने

सांगली : अस्वच्छताच अनेक आजारांना निमंत्रण देत असल्यामुळे, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागृती होण्याची नितांत गरज आहे. संतसाहित्यातील स्वच्छतेचा संदेश प्रवचनकार समाजापर्यंत चांगल्याप्रकारे पोहोचवतील. म्हणून २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधित ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा उपक्रम जिल्ह्यातील ६९९ गावांमध्ये ६० प्रवचनकारांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

जिल्हा परिषदेत जिल्हा पाणी, स्वच्छता मिशन कक्ष व वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छतेचा महाजागर’ या अभियानाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, वारकरी साहित्य परिषदेच्या महिला आघाडी प्रमुख मालुश्री पाटील, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब नरुटे, विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे आदी उपस्थित होते.

अभिजित राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासन (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग) व वारकरी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ४४ हजार गावांमध्ये प्रवचनाच्या माध्यमातून ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून ६९९ गावांमध्ये २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधित ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा उपक्रम ६० प्रवचनकारांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. संतसाहित्यातून स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली आहे आणि समाजावर संतांच्या विचारांचा पगडा असल्याने, शाश्वत स्वच्छतेसाठी प्रवचनकारांचा चांगला उपयोग होईल. मालुश्री पाटील म्हणाल्या, स्वच्छतेचा जागर करण्यासाठी वारकरी साहित्य परिषद पूर्ण सहकार्य करेल. वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब नरुटे यांनी यावेळी उपस्थित प्रवचनकारांना मार्गदर्शन केले.ग्रामस्थांना मार्गदर्शनदीपाली पाटील यांनी स्वच्छता अभियानातील सद्यस्थिती व स्वच्छतेच्या उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. गावपातळीवर दिलीप मस्के, सतीश जाधव, सुनील सावंत व चंद्रकांत कचरे यांनी मार्गदर्शन केले. 

टॅग्स :SangliसांगलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिका