इस्लामपुरात २६४ पेन्शन प्रकरणांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:22+5:302021-02-05T07:20:22+5:30
इस्लामपूर : संजय गांधी निराधार समितीच्या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही. ज्यांना पेन्शन अर्ज करायचा आहे किंवा ज्यांनी ...

इस्लामपुरात २६४ पेन्शन प्रकरणांना मंजुरी
इस्लामपूर : संजय गांधी निराधार समितीच्या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही. ज्यांना पेन्शन अर्ज करायचा आहे किंवा ज्यांनी पूर्वी अर्ज केला आहे, मात्र काही कारणांनी मंजूर झालेला नाही, त्यांनी संपर्क साधावा. त्यांच्या अर्जाची पूर्तता करण्यापासून सर्व सहकार्य व मदत करू, अशी ग्वाही संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली.
येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार समितीची दुसरी बैठक पार पडली. तहसीलदार रवींद्र सबनीस, नायब तहसीलदार धनश्री भांबुरे उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये २८० प्रकरणे आली होती. त्यातील १६ अपात्र ठरली. उर्वरित २६४ प्रकरणांना मंजुरी दिली.
यावेळी समितीचे सदस्य रामभाऊ पाटील, युवराज कांबळे, दिनकर धोंडी पाटील, संदीप माने, राहुल टिबे, सुहास रुगे, प्रणिती पेठकर, हेमंत पाटील, इलियास नायकवडी, अव्वल कारकून पवार उपस्थित होते.