पदोन्नतीसाठी ‘कास्ट्राईब’कडून २५ रोजी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:24+5:302021-06-20T04:19:24+5:30
सांगली : शासनाने दि. ७ मे रोजी अध्यादेश काढून राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे नोकरीतील पदोन्नती आरक्षण बंद केल्याने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर ...

पदोन्नतीसाठी ‘कास्ट्राईब’कडून २५ रोजी आंदोलन
सांगली : शासनाने दि. ७ मे रोजी अध्यादेश काढून राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे नोकरीतील पदोन्नती आरक्षण बंद केल्याने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. या निषेधार्थ दि. २५ जून रोजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे आणि वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी यांनी दिली.
महासंघाचे महासचिव नामदेव कांबळे, कार्याध्यक्ष रवींद्र पालवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची शनिवारी ऑनलाईन बैठक झाली. बैठकीनंतर इंगळे आणि मडावी बोलत होते. ते म्हणाले की, आरक्षणाचे जनक लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांची दि. २६ जून रोजी जयंती आहे. हा दिवस ‘आरक्षण दिन’ म्हणून साजरा केला जातो. जयंतीचे औचित्य साधून आरक्षणासंदर्भातील शासन निर्णय रद्द करून पुन्हा सुधारित आदेश काढण्याबाबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आग्रही आहे. त्यासाठी महासंघ दि. २५ जून रोजी सर्व शासकीय कार्यालयांसमोर निदर्शने करून निवेदन देणार आहे.