छाया पाटील यांच्याकडून २५ हजारांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:25 IST2021-05-17T04:25:33+5:302021-05-17T04:25:33+5:30

छाया पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ हजार रुपये पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी हंबीरराव ...

25,000 from Chhaya Patil to CM Assistance Fund | छाया पाटील यांच्याकडून २५ हजारांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस

छाया पाटील यांच्याकडून २५ हजारांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस

छाया पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ हजार रुपये पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी हंबीरराव जेडगे, प्रा. अनिल पाटील, वैभव पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा छाया पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ व्हॅक्सिन पुरवठ्यासाठी पंचवीस हजार रुपये मदतीचे धनादेश जलसंपदा मंत्री व प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपुर्द केले.

महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा छाया पाटील यांनी कामेरी येथील कर्मवीर शिक्षण संस्था व ग्रामस्थांना मदतीबाबत आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कर्मवीर शिक्षण संस्थेच्या आदर्श विद्यालय, कन्या शाळा, सुनंदा जाधव कन्या जुनिअर कॉलेज, सुनील पाटील, डॉ. रणजीत पाटील, राजेश जयसिंग पाटील, प्रा. अनिल पाटील यांनी छाया पाटील यांच्याकडे आपल्या मदतीचे धनादेश सुपुर्द केले. यावेळी आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक हंबीरराव जेडगे, राजेश जयसिंग पाटील, दीपक जाधव, अतुल कदम, वैभव पाटील, दीपक जाधव, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, प्रा. अनिल पाटील उपस्थित होते.

Web Title: 25,000 from Chhaya Patil to CM Assistance Fund