शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

कारगिलमधील वीर पुत्रांच्या बलिदानाला २५ वर्षे पूर्ण; सांगली जिल्ह्यातील सुरेश चव्हाण, महादेव पाटील यांना वीरगती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:49 IST

सांगली : सांगली जिल्हा म्हणजे क्रांतिकारकांची भूमी. स्वातंत्र्य चळवळीत अनेकांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सांगली सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला ...

सांगली : सांगली जिल्हा म्हणजे क्रांतिकारकांची भूमी. स्वातंत्र्य चळवळीत अनेकांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सांगली सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजवर जिल्ह्यातील १६० सुपुत्र भारतमातेचे रक्षण करताना शहीद झाले. सद्य:स्थितीत जवळपास २० हजार सैनिक सैन्यदलात कार्यरत आहेत, तर तेवढेच माजी सैनिक आहेत. याच जिल्ह्यातील करोली टी (ता. कवठेमहांकाळ) चे जवान सुरेश चव्हाण आणि वडगाव (ता. तासगाव) चे महादेव पाटील हे १९९९ च्या कारगिल युद्धात शहीद झाले. त्यांच्या युद्धातील पराक्रमाला २५ वर्षे झाली. या वीर पुत्रांचे बलिदान आजही स्मरणात राहते.१९९९ च्या मे महिन्यात पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली. कारगिल भागावर अतिक्रमण केले. पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी तब्बल ६० दिवस युद्ध चालले. जवळपास ३० हजार भारतीय सैनिक युद्धात सहभागी झाले होते. पाकिस्तानी लष्करातील वेगवेगळ्या रेजिमेंट यामध्ये सहभागी होत्या. त्यांनी तोफखान्याचा वापर केला. रोज बॉम्बगोळे, गोळीबार असा दोन्ही बाजूंनी वर्षाव सुरू होता. भारताने कडवी झुंज देत निकराचा प्रतिकार केला. यामध्ये ५२७ जवान कामी आले, तर १३६३ जवान शहीद झाले. ऑपरेशन विजय ६० दिवसांनंतर यशस्वी झाले. २६ जुलै १९९९ रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला.

कारगिल युद्धात त्यावेळी जिल्ह्यातील काही सैनिक सहभागी होते. युद्धाचा प्रसंग पाहून सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य चिंतेत होते. दुर्दैवी बातमी कानावर पडू नये, अशी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक प्रार्थना करत होते. त्याचवेळी करोली टी (ता. कवठेमहांकाळ) चे वीर पुत्र हवालदार सुरेश गणपती चव्हाण हे महार रेजिमेंटमधून पाकिस्तानी सैन्याला मुकाबला करताना शर्थीची झुंज देत होते. त्यांनी व त्यांच्या रेजिमेंटने अतुलनीय शौर्य गाजवत शेकडो पाकड्यांना यमसदनी पाठवले. सुरेश चव्हाण हे तब्बल दोन महिने शत्रूशी लढत होते. दि. ४ जुलै रोजी ते धारातिर्थी पडले. त्यांच्या शहीद होण्याची वार्ता समजताच करोली टी नव्हे तर जिल्हा शोकसागरात बुडाला.कारगिल युद्ध संपण्याची सर्वांनाच प्रतीक्षा असताना जिल्ह्यात आणखी एक दुर्दैवी बातमी येऊन धडकली. वडगाव (ता. तासगाव) येथील पॅरा रेजिमेंटचे शिपाई महादेव नामदेव पाटील हे कारगिलमध्ये युद्धात पराक्रम गाजवत होते. त्याचवेळी शत्रूच्या हल्ल्यात दि. २४ जुलै १९९९ रोजी वीरगती प्राप्त झाली. त्यामुळे जिल्हा पुन्हा शोकसागरात बुडाला. जिल्ह्यातील या दोन वीर पुत्रांनी युद्धात गाजवलेल्या पराक्रमाला आणि त्यांच्या वीरगतीला दि. २६ जुलै रोजी २५ वर्षे होत आहेत. त्यांच्या पराक्रमाच्या आठवणीही आज स्मरणात आहेत.

शौर्याची परंपरास्वातंत्र्यपूर्व काळात जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. हीच शौर्याची परंपरा जिल्ह्याने जपली आहे. सैन्यदलात सद्य:स्थितीत २० हजारांहून अधिक जवान कार्यरत आहेत, तर देशसेवा बजावलेले तेवढेच माजी सैनिक जिल्ह्यात आहेत.

आजवर १६० शहीदभारत-पाक, भारत-चीन युद्धासह वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील वीर जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले आहे. आजवर १६० जवान शहीद झाले. ७० जणांना शौर्यपदक मिळाले.

टॅग्स :SangliसांगलीKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन