जिल्ह्यात कोरोनाचे नवे २४७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:36+5:302021-09-10T04:33:36+5:30
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवे २४७ रुग्ण आढळून आले, तर ३१६ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील १३ जणांचा ...

जिल्ह्यात कोरोनाचे नवे २४७ रुग्ण
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवे २४७ रुग्ण आढळून आले, तर ३१६ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
मंगळवारी महापालिका क्षेत्रात २६ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीत १९, मिरजेत ६ रुग्णांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यात ३४, जत १६, कडेगाव २०, कवठेमहांकाळ १०, खानापूर ५६, मिरज २३, पलूस ०४, शिराळा ०२, तासगाव ४८, वाळवा ०८, तर जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, कर्नाटकातील ८ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात जिल्ह्यातील १३ जणांचा मृत्यू झाला. त्यात खानापूर, मिरज तालुक्यातील प्रत्येकी ४, तासगाव २, वाळवा १, तर महापालिका क्षेत्रात सांगली व मिरजेतील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. सध्या ४९९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आरटीपीसीआरच्या १८१६ चाचण्यांत ९८ पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ४३६४ चाचण्यांत १५७ रुग्ण सापडले.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : १,९५०९१
कोरोनामुक्त झालेले : १,८७८१६
आतापर्यंतचे मृत्यू : ५१४०
उपचाराखालील रुग्ण : २१३५
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
सांगली : १९
मिरज : ६
आटपाडी : ३४
जत : १६
कडेगाव : २०
कवठेमहांकाळ : १०
खानापूर ५६
मिरज २३
पलूस ०४
शिराळा ०२
तासगाव ४८
वाळवा ०८