सोमवारी दिवसभरात २३,७३१ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:27 IST2021-04-27T04:27:56+5:302021-04-27T04:27:56+5:30
सांगली : सोमवारी दिवसभरात जिल्हाभरात पूर्ण क्षमतेने लसीकरण झाले. ग्रामीण भागात १७ हजार, तर महापालिका क्षेत्रात चार हजार जणांना ...

सोमवारी दिवसभरात २३,७३१ जणांचे लसीकरण
सांगली : सोमवारी दिवसभरात जिल्हाभरात पूर्ण क्षमतेने लसीकरण झाले. ग्रामीण भागात १७ हजार, तर महापालिका क्षेत्रात चार हजार जणांना लस टोचण्यात आली. लसीचे सुमारे सहा हजार डोस शिल्लक आहेत.
रविवारी ५५ हजार डोस मिळाल्यानंतर सर्वत्र लसीकरणाला वेग आला. २४ हजार ४८८ जणांचे लसीकरण झाले होते. मंगळवारीदेखील सर्वत्र गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषत: ग्रामीण भागात आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांवर रांगा लागल्या होत्या. दुसऱ्या डोससाठीदेखील लाभार्थी येऊ लागल्याने गर्दीत भर पडली. महापालिका क्षेत्रात तर शहरी आरोग्य केंद्रांवर जत्रेसारखी गर्दी उसळली होती. नियोजन ढासळले होते. याच धांदलीत दिवसभरात २३ हजार ७३१ जणांचे लसीकरण झाले.
चौकट
सोमवारपासून टोकन पद्धतीचा अंमल
गर्दी वाढू लागल्याने टोकन पद्धत सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले. रविवारी तसे पत्र काढले. सोमवारपासूनच त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. त्यानुसार लाभार्थ्यांना लसीकरणाचा संभाव्य दिवस आणि वेळेचे कुपन दिले जात आहे. लसीकरण केंद्रावर नाव नोंदविल्यानंतर कुपन मिळते. त्यानुसार लाभार्थ्याने केंद्रावर येणे अपेक्षित आहे. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात सर्वत्र याची अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे केंद्रांवर नाहक गर्दी उसळणार नाही, अशी अपेक्षा आहे.
चौकट
सोमवारचे लसीकरण असे...
- ग्रामीण भागात १६,९४६
- निमशहरी भागात २,७०७
- महापालिका क्षेत्रात - ४,०७८
- एकूण २३,७३१