जिल्ह्यात कोरोनाचे २३२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:32 IST2021-09-17T04:32:31+5:302021-09-17T04:32:31+5:30
सांगली : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे नवे २३२ रुग्ण आढळून आले, तर आठ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात २८६ जण कोरोनामुक्त ...

जिल्ह्यात कोरोनाचे २३२ रुग्ण
सांगली : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे नवे २३२ रुग्ण आढळून आले, तर आठ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात २८६ जण कोरोनामुक्त झाले.
गुरुवारी महापालिका क्षेत्रात २६ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीत २१, मिरजेत पाच रुग्णांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यात ४७, जत १७, कडेगाव १५, कवठेमहांकाळ ७, खानापूर ३०, मिरज १९, पलूस ०८, शिराळा ०४, तासगाव ४०, वाळवा १९, तर जिल्ह्याबाहेरील कोल्हापूर, सातारा, कर्नाटक येथील तीन रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत. दिवसभरात जिल्ह्यातील आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात जत, वाळवा तालुक्यातील प्रत्येकी १, तासगाव दोन, तर महापालिका क्षेत्रात मिरजेतील दोन रुग्णांचा समावेश आहे. सध्या ४४९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आरटीपीसीआरच्या ८९१ चाचण्यांत ९९ पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ३४३६ चाचण्यांत १३६ रुग्ण सापडले.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : १,९६,५४०
कोरोनामुक्त झालेले : १,९००२६
आतापर्यंतचे मृत्यू : ५१८६
उपचाराखालील रुग्ण : १३२८
चौकट
गुरुवारी दिवसभरात...
सांगली : २१
मिरज : ५
आटपाडी : ४७
जत १७
कडेगाव १५
कवठेमहांकाळ ७
खानापूर ३०
मिरज १९
पलूस ०८
शिराळा ०४
तासगाव ४०
वाळवा १९