साखराळे येथे गुंडांकडून २३ हजारांच्या दारूची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:24 IST2021-01-17T04:24:04+5:302021-01-17T04:24:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) गावच्या हद्दीत ताकारी रस्त्यावर असलेल्या एका बीअर शॉपीचालकास चाकूचा धाक दाखवत ...

23,000 liquor looted by goons at Sakharale | साखराळे येथे गुंडांकडून २३ हजारांच्या दारूची लूट

साखराळे येथे गुंडांकडून २३ हजारांच्या दारूची लूट

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) गावच्या हद्दीत ताकारी रस्त्यावर असलेल्या एका बीअर शॉपीचालकास चाकूचा धाक दाखवत तिघा गुंडांनी तीन दिवसांत २३ हजार रुपयांची दारू जबरदस्तीने लुटली. दुकान फोडून टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकीसुद्धा त्यांनी दिली.

याबाबत सुखदेव काकासाहेब पाटील (इस्लामपूर) यांनी शनिवारी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार सोन्या लोहार, छोट्या पाटोळे आणि दाद्या भोसले (तिघे रा. साखराळे) यांच्याविरुद्ध लूटमारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या तिघांनी १४ ते १६ जानेवारी या तीन दिवसांत पाटील यांना चाकूचा धाक दाखवत आणि दुकान फोडून टाकण्याची धमकी देत २३ हजार २०० रुपयांचा दारूसाठा जबरदस्तीने काढून घेतला. त्यांच्या या त्रासाला कंटाळून पाटील यांनी शनिवारी पोलिसांत धाव घेतली.

Web Title: 23,000 liquor looted by goons at Sakharale