शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सांगलीतून मोफत शस्त्रक्रियेसाठी २२ बालके अकोल्याला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 15:13 IST

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दुभंगलेले ओठ, टाळू या आजाराकरिता संदर्भित करण्यात आलेल्या 27 बालकांकरिता दिनांक 20 जून 2019 रोजी डॉ. एन. आर. सलामपुरिया, श्रीराम हॉस्पिटल, अकोला यांच्या सहकार्याने प्राथमिक तपासणी शिबीर संपन्न झाले होते. या तपासणीअंती शस्त्रक्रियेकरिता पात्र ठरलेल्या व शस्त्रक्रियेस शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त असणाऱ्या २२ बालकांना सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथून स्वतंत्र बसने श्रीराम हॉस्पिटल येथे शस्त्राक्रियेसाठी पाठविण्यात आले. या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देसांगलीतून मोफत शस्त्रक्रियेसाठी २२ बालके अकोल्याला रवानाराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणी शिबीर

सांगली : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दुभंगलेले ओठ, टाळू या आजाराकरिता संदर्भित करण्यात आलेल्या 27 बालकांकरिता दिनांक 20 जून 2019 रोजी डॉ. एन. आर. सलामपुरिया, श्रीराम हॉस्पिटल, अकोला यांच्या सहकार्याने प्राथमिक तपासणी शिबीर संपन्न झाले होते. या तपासणीअंती शस्त्रक्रियेकरिता पात्र ठरलेल्या व शस्त्रक्रियेस शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त असणाऱ्या २२ बालकांना सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथून स्वतंत्र बसने श्रीराम हॉस्पिटल येथे शस्त्राक्रियेसाठी पाठविण्यात आले. या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी बालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.बालक व त्यांच्या पालकांचा पूर्ण प्रवास, शिबिरादरम्यानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्थाही पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया स्माईल ट्रेन या सेवाभावी संस्थेमार्फत करण्यात येतात. सद्यस्थितीस सांगली जिल्ह्यामध्ये ही योजना कोणत्याही रूग्णालयाकडे उपलब्ध नसून इतर शासकीय योजनांमध्ये या शस्त्रक्रियेचा समावेश नाही.

स्माईल ट्रेन या योजनेकरिता रूग्णास एकही कागदपत्राची आवश्यकता नसल्याने पालकांना सोयीचे होत आहे. अकोला येथील रूग्णालयामध्ये या योजनेतून बालकांच्या शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे व पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याने रूग्णांस एक रूपयाही खर्च करण्याची आवश्यकता भासत नाही. मागील तीन वर्षापासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अकोला येथे करण्यात आलेल्या या प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर बालके सामान्य जीवन जगत असून दुभंगलेल्या ओठांमुळे त्यांच्या चेहऱ्याचे होणारे विद्रुपीकरण देखील नाहीसे झाले आहे.खाजगी रूग्णालयात या शस्त्रक्रियांकरिता प्रति शस्त्रक्रिया 90 हजार ते 1 लाख रूपये पर्यंतचा खर्च करावा लागतो. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या प्रयत्नाने आतापर्यंत जिल्ह्यातील 232 बालकांवर या प्रकारच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात येत आहे.

वैद्यकीय अधिकारी महिला व पुरूष, औषधनिर्माता व परिचारिका अशा 4 जणांच्या पथकांमार्फत तपासणी करण्यात येते. प्रति 25 हजार बालकांसाठी एक याप्रमाणे सांगली जिल्ह्यासाठी एकूण 32 वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमार्फत किरकोळ आजार असणाऱ्या लाभार्थ्यांना जागेवरच औषधोपचार करण्यात येतात. तपासणीमधून हृदयरोग बालके तसेच अस्थिव्यंग, कान-नाक-घसा, हार्निया, फायमोसिस, अनडिसेंडेड टेस्टीज सारख्या आजारांसाठी बालके संदर्भित करण्यात येतात.

टॅग्स :Healthआरोग्यSangliसांगली