नोकरीच्या आमिषाने २१ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 05:45 IST2018-05-17T05:45:49+5:302018-05-17T05:45:49+5:30
रेल्वे पोलीस आणि इतर विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून व बनावट नेमणूकपत्र देऊन रावळगुंडवाडी येथील चार सुशिक्षित बेरोजगारांना तब्बल २१ लाखांचा गंडा घातल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

नोकरीच्या आमिषाने २१ लाखांचा गंडा
जत (जि. सांगली) : रेल्वे पोलीस आणि इतर विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून व बनावट नेमणूकपत्र देऊन रावळगुंडवाडी येथील चार सुशिक्षित बेरोजगारांना तब्बल २१ लाखांचा गंडा घातल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
फसवणूकप्रकरणी सचिन आण्णाराया अमृतहट्टी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जून २०१६ पासून बसवराज सत्याप्पा हिरगोंड, महेश महादेव पाटील, काशिनाथ विद्यासागर जुमनाळ, अरविंद सदाशिव हिरगोंड यांच्याकडून सचिनने २१ लाख ३९ हजार रुपये घेतले. त्याने चौघांना खोटे दस्तऐवज तयार करून बनावट नेमणूकपत्र दिले.