शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: मिरजेत मृताच्या खात्यातील २१ लाखांवर बँक व्यवस्थापकाचाच डल्ला, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 17:31 IST

खातेदार राव यांच्या बहिणीच्या मुलाने मामाच्या खात्याची चाैकशी करून या खात्यातील रक्कम वर्ग झाल्याबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला.

मिरज : मिरजेत स्टेट बँकेच्या शाखेतील मृत खातेदाराच्या खात्यातील २१ लाख २८ हजार ३६४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक अनिल साळे व त्याचा साथीदार अवधूत पाटील या दोघांना फसवणूक प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांना पाच दिवस पोलिस कोठडी दिली.मिरजेतील  स्टेट बँकेच्या वाॅन्लेस हाॅस्पिटल शाखेत रघुवीरकुमार रतन राव खातेदार होते. बिहारमधील रघुवीर राव आखाती देशात नोकरीस होते. राव मिरजेला उपचारासाठी येत असल्याने त्यांनी मिरजेत स्टेट बँक शाखेत तीन खाती काढून त्यात २१ लाख रक्कम ठेवली होती. ११ मार्च २०१८ रोजी राव दिल्ली येथे मृत झाले. त्यामुळे त्यांच्या एकूण तीन खात्यांतील व्यवहार दोन वर्षे बंद होते.  या खात्यात २१ लाख २८ हजार ३६४ रुपयांची रक्कम शिल्लक होती.  खातेदार राव यांना वारस नसल्याचे व ते मृत असल्याचे लक्षात आल्यानंतर तात्कालीन व्यवस्थापक अनिल साळे याने ही रक्कम हडप करण्याचा डाव रचला. साळे याने राव यांची बोगस सही करून त्याचा मित्र अवधूत पाटील याच्या खात्यावर रक्कम वर्ग केली. दोघांनी मृत खातेदाराच्या खात्यातील २१ लाखांच्या रकमेवर डल्ला मारून ही रक्कम वाटून घेतली. मात्र, खातेदार राव यांच्या बहिणीच्या मुलाने मामाच्या खात्याची चाैकशी करून या खात्यातील रक्कम वर्ग झाल्याबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला.  याबाबत व्यवस्थापनातर्फे विद्यमान व्यवस्थापक मयूर चंद्रशेखर यळमळ्ळी यांनी याबाबत  पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल होताच साळे व अवधूत पाटील यांना अटक केली असून सरकारी  बँकेतच असा  प्रकार घडल्याने खळबळ उडाली होती.दरम्यान, शासकीय बँकेतील अधिकाऱ्यांकडून असा प्रकार झाल्यामुळे बँक ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. बँक कर्मचारीही चिंतेत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीbankबँक