अंकलगीत २० हजाराची देशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:26 IST2021-01-08T05:26:52+5:302021-01-08T05:26:52+5:30

संख : अंकलगी (ता. जत) येथे अवैधरित्या दारू विक्री करत असताना हुसेनबाशा लालासाहेब अपराध (वय २३) याच्याकडून २० हजार ...

20,000 local liquor confiscated | अंकलगीत २० हजाराची देशी दारू जप्त

अंकलगीत २० हजाराची देशी दारू जप्त

संख : अंकलगी (ता. जत) येथे अवैधरित्या दारू विक्री करत असताना हुसेनबाशा लालासाहेब अपराध (वय २३) याच्याकडून २० हजार १६० रुपये किमतीची देशी दारू उमदी पोलिसांनी छापा टाकून जप्त केली.

पूर्व भागातील ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर अवैध धंदे मोडीत काढण्याचे आदेश आहेत. उमदीच्या पोलीस पथकाला अंकलगी येथे बसस्थानकाजवळ एक व्यक्ती अवैधरित्या दारू विक्री करत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता हुसेनबाशा अपराध दारू विकत असल्याचे दिसून आले. यावेळी सहा बाॅक्स देशी दारू जप्त केली आहे. तिची किंमत २० हजार १६० रुपये आहे. ही कारवाई सहायक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, इंद्रजित घोदे, सदा करांडे, महातेश करांडे यांनी केली.

Web Title: 20,000 local liquor confiscated