शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून मिळालेले 2000 रुपये शेतीसाठी वापरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 12:12 IST

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 2 हजार रुपये मिळाले आहेत. ही मदत आम्ही शेतीसाठी वापरणार, अशी प्रतिक्रिया मिरज तालुक्यातील पाटगाव तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून मिळालेले 2000 रुपये शेतीसाठी वापरणारपाटगावमधील लाभार्थींची प्रतिक्रिया

सांगली : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 2 हजार रुपये मिळाले आहेत. ही मदत आम्ही शेतीसाठी वापरणार, अशी प्रतिक्रिया मिरज तालुक्यातील पाटगाव तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रति अल्प व अत्यल्प भूधारकशेतकरी कुटुंबाला प्रति वर्ष 6 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य 3 टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा जमा होण्याच्या कार्यवाहीला दि. 24 फेब्रुवारीपासून सुरवात झाली आहे.

मिरज तालुक्यातील पाटगाव येथील काही शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा झाल्याचा संदेश भ्रमणध्वनीवर प्राप्त झाला आहे. त्यावर या लाभार्थींनी प्रतिक्रिया देत शासनाचे आभार मानले आहेत.पाटगावच्या नामदेव नाना चव्हाण यांच्या कुटुंबात पत्नी दोन अविवाहित मुले आणि एक अविवाहित मुलगी आहे. एक मुलगा आणि एका मुलीचा विवाह झाला आहे. त्यांची 54 गुंठे शेती आहे. शेतात शाळू, गहू ते लावतात. मात्र, शेती करताना निसर्गाच्या अनियमिततेचा फटका त्यांना अनेक वेळा बसला. त्यामुळे एवढे मोठे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी ते शेतीसोबत मिरज एमआयडीसीत कामालाही जातात. त्यामुळे वर्षाला 6 हजार रुपये मिळणारी रक्कम त्यांना मदतपूर्ण ठरणार आहे.

यातील पहिल्या हप्त्यातील 2 हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. ही रक्कम शेतीसाठी बी-बियाणे याच्यासाठी पूरक ठरणार आहे. याबद्दल त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.गजानन ज्ञानदेव सावंत यांचे वडील, पत्नी आणि मुलगा असे चौकोनी कुटुंब. त्यांना परंपरागत अर्धा एकर शेती मिळाली आहे. त्यात ते केळीची लागवड करतात. बारावी शिक्षण असूनही परंपरागत शेती ते करतात. त्याच्या जोडीला कपडे शिलाईचे कामही करतात.

सांगली येथे 24 फेब्रुवारीला प्रधानमंत्री किसान योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमातच त्यांना त्यांची निवड झाल्याचा संदेश प्राप्त झाला. तर त्यांच्या बँकेत 2 हजार रुपये प्राप्त झाल्याचाही संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर आला आहे. यातून शेतीसाठी त्यांच्या खिशातील काही रक्कम वाचणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.पाटगावमधीलच शिवाजी शंकर सावंत यांच्या घरी पत्नी, एक विवाहित व एक अविवाहित अशी 2 मुले, सून, 2 नातवंडे आहेत. त्यांची 27 गुंठे शेती असून, ते पूर्णवेळ शेती करतात. शेतात शाळू, सोयाबीन लागवड करतात. त्यांचे विवाहित चिरंजीव प्रकाश पंपावर कामाला जातो. तर एक मुलगा शिक्षण घेत आहे. त्यांच्या भ्रमणध्वनीवर 2 हजार रुपये जमा झाल्याचा संदेश प्राप्त झाल्याची माहिती प्रकाश सावंत यांनी दिली.

पाटगावचे 83 वर्षीय सदाशिव निवृत्ती पाटील यांनीही इतर शेतकऱ्यांप्रमाणे आपल्या खात्यावर पैसे जमा होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. शासनाने योग्य वेळी मदत केली असून, आपल्या शेतीसाठी ती पूरक ठरणार असल्याची प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली