शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत उद्योजकांकडून २००० कोटींची गुंतवणूक, ४ हजार ४८९ जणांना मिळणार रोजगाराची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:03 IST

उद्योग संचालनालयासोबत सामंजस्य करार 

प्रसाद माळीसांगली : राज्यातील उद्योग संचालनालयाकडून राज्य तसेच विविध जिल्ह्यांत उद्योगवाढीसाठी व रोजगार निमिर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गत सांगली जिल्हास्तरीय गुतंवणूक परिषद १२ एप्रिलला होणार आहे. सांगलीतील या गुंतवणूक परिषदेमध्ये १४७ उद्योजकांशी सामंजस्य करार होणार आहेत. त्यामध्ये सांगलीत तब्बल दोन हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात ४ हजार ४८९ रोजगार निर्मिती होणार आहे.उद्योग संचालनालयाचे पुणे विभागीय कार्यालय आणि सांगली जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे ‘जिल्ह्यास्तरीय गुंतवणूक परिषद २०२५’ होणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे, विभागीय उद्योग सहसंचालक एस. जी. राजपूत हे मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत १४७ उद्योजकांशी उद्योग संचालनालय सामजंस्य करार करणार आहे. यामुळे जिल्ह्यातील विकासाला मोठी चालना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी दिली.

गुंतवणूक परिषदेचे उद्देश

  • गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करणे.
  • राज्यातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी गुंतवणूक आकर्षित करणे.
  • जिल्ह्याच्या विकासाला चालना देणे.
  • राेजगाराच्या संधी निर्माण करणे.

असे होणार प्रमुख सामंजस्य करार..उद्योगाचे नाव गुंतवणूक (कोटी)साईचैन इंडस्ट्री - २९पी. जी. इंडस्ट्री - २८.९द सुप्रिम इंडस्ट्री - ४००शाह लागू प्रापर्टी - ६२.३ जी. आर. मोहिते प्रा. लि. - ५१.५०

सामजस्य करारातून जिल्ह्यातील उद्योजकांना शासनाकडून जमीन, वीज, पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यांची तातडीने पूर्तता करून उद्याेगास चालना दिली जाणार आहे. टेक्सटाइल, प्लॅस्टिक, शेतीपूरक उद्योगांसह विविध क्षेत्रांत गुंतवणूक होणार आहे. यामध्ये २० टक्के महिला उद्योजकांचा समावेश असणार आहे. - विद्या कुलकर्णी, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सांगली.

टॅग्स :Sangliसांगली