अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला २० लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:27 IST2021-05-07T04:27:48+5:302021-05-07T04:27:48+5:30
संस्थेच्या स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग 'अ' मिळाला असून संचालक मंडळ, कर्मचारीवर्ग व सभासद ठेवीदार यांच्या विश्वासावर चाललेली एक आदर्श ...

अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला २० लाखांचा नफा
संस्थेच्या स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग 'अ' मिळाला असून संचालक मंडळ, कर्मचारीवर्ग व सभासद ठेवीदार यांच्या विश्वासावर चाललेली एक आदर्श संस्था म्हणून ओळखली जात आहे.
चौगुले म्हणाले, आर्थिक वर्षामध्ये संस्थेचे अधिकृत भागभांडवल ५० लाख ८० हजार निधी. १५ लाख ३२ हजार ठेवी. १० कोटी १३ लाख कर्ज. ७ कोटी १५ लाख गुंतवणूक. १ कोटी ६६ लाख निव्वळ नफा. २० लाख व शंभर टक्के वसुली. संस्थेच्या एकूण ठेवी दहा कोटी १४ लाख इतकी आहे. संस्थेचे एकूण कर्ज वाटप सात कोटी १५ लाख एवढे झाले असून संस्थेची असणारी वसुलीची परंपरा शंभर टक्के झाली आहे.
संस्थेच्या माध्यमातून अनेक ठेव योजना, जीवन समृद्धी ठेव, अंकलेश्वर लखपती ठेव योजना अशा योजना व कर्जयोजना आहेत. संस्थेच्या अंतर्गत अंकलेश्वर कृषी सेवा केंद्र, अंकलेश्वर पशुखाद्य सेवा व अंकलेश्वर हायटेक नर्सरी या माध्यमातून सर्व सभासद व शेतकरी बांधवांना सेवा पुरवली जात आहे.