शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींचा मुद्देमाल जप्त, ५० गुन्हेगार हद्दपार; सांगली जिल्हा पोलिसांची कारवाई

By संतोष भिसे | Updated: November 14, 2024 15:31 IST

८०२ जणांना अजामिनपात्र वारंट

सांगली : सांगली जिल्ह्यात निवडणूक काळात आतापर्यंत दोन कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ५० गुन्हेगारांना हद्दपार केले असून ८०२ जणांना अजामिनपात्र वाॅरंट बजावण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी ही माहिती दिली.घुगे म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारसंघांत एकूण आठ स्ट्राँग रूम तयार केल्या आहेत. तेथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक शांततेत, मुक्त व नि:पक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. आतापर्यंत नऊ अग्नीशस्त्रे जप्त केली आहेत. २७ प्रकारची अन्य तीक्ष्ण हत्यारे जप्त केली आहेत. जिल्ह्यात सुमारे २४०० परवानाधारक शस्त्रे असून निवडणुकीमुळे सर्व शस्त्रे जमा करुन घेण्यात आली आहेत. यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या सर्व आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. विशेषत: करून झोपडपट्टीदादांचा बंदोबस्त केला असून मोका कायद्यांतर्गतही कारवाया केल्या आहेत.घुगे म्हणाले, ९ आंतरराज्य तपासणी नाक्यांवर संशयास्पद बाबींची तपासणी सुरु आहे. आतापर्यंत दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ९२ लाखांची रोकड, ६५ लाख रूपयांपेक्षा जास्त किंमतीचे अवैध मद्य, ५३ लाख रूपयांहून जास्त किंमतीचा गुटखा, सात लाख रूपयांहून जास्त किंमतीचा गांजा आणि तीन लाखांचे दागिने यांचा समावेश आहे. बंदोबस्तासाठी लष्कराच्या आठ कंपन्या सज्ज आहेत.

घुगे म्हणाले, निवडणुकीसंदर्भातील पाच गुन्हे विविध ठिकाणी दाखल झाले आहेत. निवडणुकीत समन्वयासाठी बिनतारी संदेश, मोटर परिवहन विभाग यांचाही उपयोग करून घेण्यात येत आहे. पोलिसांना टपाली मतदानाची सुविधा दिली आहे. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचलन केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Policeपोलिस