शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

सांगली जिल्ह्यातील १९१ एसटी बसेस कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:56 IST

सांगली जिल्ह्यात ८२६ एसटी बसेसपैकी दहा वर्षावरील १९१ बसेस असून, या कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या, या प्रशासनाच्या धोरणामुळे जिल्ह्याची लाल परी सध्या संकटात सापडली आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील १९१ एसटी बसेस कालबाह्यप्रशासनाच्या धोरणामुळे लाल परी संकटात

अशोक डोंबाळे सांगली : जिल्ह्यात ८२६ एसटी बसेसपैकी दहा वर्षावरील १९१ बसेस असून, या कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या, या प्रशासनाच्या धोरणामुळे जिल्ह्याची लाल परी सध्या संकटात सापडली आहे.एसटी महामंडळाला नियोजनशून्यतेमुळे तोट्याचा सामना करावा लागतो. अशाही परिस्थितीत जास्त उत्पन्न देणारे आगार म्हणून सांगली जिल्ह्यातील बहुतांशी आगारांची ओळख आहे. जिल्ह्यातील दहा आगारांमध्ये दोन वर्षांपासून नवीन एकही बस आलेली नाही. यामुळे लांबच्या मार्गावरही जुन्याच बसेस पाठवाव्या लागत आहेत.

महामंडळाच्या नियमानुसार तीन लाख किलोमीटरपेक्षा कमी पळालेल्या बसच लांब पल्ल्याच्या मार्गावर पाठविण्याचा नियम आहे. परंतु, मागील दोन वर्षात एकाही बसची खरेदी झालेली नाही. यामुळे सध्या एसटीच्या ताफ्यातील ८२६ बसेसपैकी ९५ टक्के बसेस तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या आहेत. सांगली, मिरज आगारातून रोज पुणे, नाशिक, नांदेड, सोलापूर, परभणी, अहमदनगर, बारामती मार्गावर बसेस धावत आहेत.तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडता येत नाहीत. पण, बसेसच नसल्यामुळे नियम मोडून चार ते पाच लाख किलोमीटर धावलेल्या आणि पाच ते सहा वर्षाच्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर जात आहेत. जिल्ह्यातील आगारांकडे सध्या ८२६ बसेस आहेत. त्यापैकी १९१ बसेस दहा ते तेरा वर्षे वापरलेल्या आहेत. नवीन बसेस मिळत नसल्याने जुन्याच बसेसना दुरूस्त वापरल्या जात आहे. या बसेसही रोज १०० ते २०० किलोमीटर अंतर धावून येत आहेत. या बसेस कधी रस्त्यातच बंद पडत आहेत, तर कधी गळक्या छतामुळे पावसाचे पाणी प्रवाशांच्या अंगावर पडत आहे.

टॅग्स :state transportएसटीSangliसांगली