शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

सांगलीत ७९ वर्षांच्या ‘तरुणा’ची जलतरणात बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:04 IST

सांगली : वय वर्षे अवघे ७९... त्यांचा दिनक्रम सुरू होतो पहाटे आणि संपतो रात्री... दिवसभर स्विमिंग पूलवर मुलांना जलतरणाचे ...

सांगली : वय वर्षे अवघे ७९... त्यांचा दिनक्रम सुरू होतो पहाटे आणि संपतो रात्री... दिवसभर स्विमिंग पूलवर मुलांना जलतरणाचे धडे आणि स्वत: देशभरातील स्पर्धांमध्ये सहभाग... हा ७९ वर्षांचा तरुण म्हणजे उल्हास बाबूराव तामगावे. वय वाढल्यानंतर शारीरिक व्याधींनी त्रास होणे आलेच; पण त्यावरही मात करून तामगावे या वयातही देशभर जलतरणातील स्पर्धा गाजवित आहेत. आजवर शंभरावर सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकांचे ते मानकरी ठरले आहेत.मूळचे कवठेपिरानचे असलेल्या तामगावे यांना बालपणापासूनच जलतरणाची आवड होती. शिक्षणाच्या निमित्ताने सांगलीत आलेल्या तामगावेंनी ती आवड जोपासली, वाढवली. भिडे जलतरण केंद्रावर प्रशिक्षक म्हणून काम करत असताना, तेथे इतर मुलांना शिकविणाऱ्या आंतरराष्ट्रीय कोच एस. के. कावले यांच्याकडून जलतरणातील प्रकार आत्मसात केले. त्यानुसार फ्री स्टाईल, ब्रेस स्ट्रोक, बॅक स्ट्रोक आणि मिडले रिलेमध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले. २००५ ला राजकोट येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी विक्रम प्रस्थापित केला. आजवर त्यांनी देशभर विविध शहरात झालेल्या जलतरण स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. बेंगळुरू, राजकोट, हैदराबाद, इंदोर, गुलबर्गा येथील सहभाग त्यांचा उल्लेखनीय आहे. त्यांनी आजवर ३० सुवर्ण, २५ रौप्य, तर कांस्य पदकांचीही कमाई केली आहे.सध्या वयाच्या ७९ व्या वर्षीही ते जलतरण क्षेत्रात कार्यरत आहेत. शहरातील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये ते जलतरण प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सकाळी साडेआठपासून सायंकाळी पाचपर्यंत ते मुलांना जलतरणातील धडे देत असतात. शनिवार व रविवारी अधिक सराव करून त्यांनी जलतरणातील सराव कायम ठेवला आहे. तामगावे यांनी स्वत:तर क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळविलेच शिवाय आपल्या दोन मुलींनाही त्यांनी खेळाडू बनविले. त्यांची कन्या अरुणाने जलतरणात राष्ट्रीय पातळीवर मजल मारली, तर दुसरी कन्या राजमती यांनी हॉकीमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखविली आहे. त्यांच्या पत्नी इंदूमती यांचे बारकाईने लक्ष असते.पूर्ण शाकाहार आणि सरावात सातत्य हेच यशाचे गमकवयाच्या ७९ व्या वर्षीही जलतरण स्पर्धेत सहभागी होणाºया उल्हास तामगावे यांना याचे गमक विचारले असता, त्यांनी पूर्ण शाकाहारी असणे व सरावातील सातत्यतेवर भर दिला. पूर्ण शाकाहाराबरोबरच मर्यादीत सकस आहार, मोड आलेल्या धान्याचा वापर आणि पूर्ण वर्ज्य केलेल्या भातामुळे शरीरयष्टी अद्याप दणकट असल्याचे सांगितले.